चंद्रपूर महानगर पालिका व घुग्घुस नगरपरिषद निवडणुकीच्या संदर्भात एआयएमआयएमची बैठक संपन्न

32

🔹घुग्घुस नपची निवडणूक संपूर्ण ताकतीने लढणार

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.28फेब्रुवारी):-रविवार २७ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथील विश्रामगृहात एआयएमआयएमचे महाराष्ट्र प्रवक्ता व जिल्हा प्रभारी प्रा. जावेद पाशा व जिल्हाध्यक्ष एड. नाहिद हुसैन यांच्या मार्गदर्शनात जिल्हा व शहर कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीत चंद्रपूर महानगर पालिका व घुग्घुस परिषदेच्या प्रभाग रचना, निवडणुकी नुसार जागा लढविण्यासाठी प्रभागाची निवड, संभाव्य उमेदवारांची निवड, निवडणूक रणनीती, समविचारी लोकांशी ताळमेळ अश्या विषयावर चर्चा व विचारमंथन करण्यात आले.

होणाऱ्या चंद्रपूर महानगर पालिका व घुग्घुस नगर परिषदेच्या निवडणुका एआयएमआयएम ही संपूर्ण ताकतीने लढणार असा मानस व्यक्त बैठकीत करण्यात आला असून घुग्घुस नगर परिषदेच्या संपूर्ण जागा ही लढविण्यात येणार आहे.यावेळी चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष एड. नाहिद हुसैन, जिल्हा युथअध्यक्ष शाहिद शेख, जिल्हा उपाध्यक्ष अमान अहमद, जिल्हा महासचिव अशरफ खान, जिल्हा सचिव जाकीर शेख, शहराध्यक्ष अजहर शेख, शहर महासचिव व दुर्गापूर प्रभारी साजिद अशरफी, घुग्घुस प्रभारी समीर मिर्झा, घुग्घुस शहराध्यक्ष सानू सिद्दीकी व जिल्हा, शहर व घुग्घुस शहर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.