बीड जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते पोलिओ लसीकरणाचे उद्घाटन

31

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.28फेब्रुवारी):-दरवर्षी झिरो ते पाच वर्षे वयोगटातील मुलांना पोलिओची लस दिली जाते. आज सर्वत्र लसीकरण सुरू असून सकाळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयात लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. लसीकरणानंतर जिल्हाधिकार्‍यांनी रुग्णालयातील वार्डाची पाहणी केली.

पोलिओचा नायनाट करण्यासाठी दरवर्षी पोलिओ डोस पाजले जातात. आज सर्वत्र झिरो ते पाच वयोगटातील मुलांना डोस पाजले जात आहेत. सकाळी जिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.शुभारंभानंतर जिल्हाधिकार्‍यांनी रुग्णालयातील काही वॉर्डात जावून त्याठिकाणची पाहणी केली. या वेळी त्यांच्या समवेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गिते यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी यांची उपस्थिती होती.