आगामी काळात आपल्या गावचा गटाचा विकास करणाऱ्या लोकप्रतिनिधींना निवडून द्या नामदार छगन भुजबळ यांचेआवाहन

32

✒️नाशिक,विभागीय प्रतिनिधी(विजय केदारे)

नाशिक(दि.28फेब्रुवारी):-प्रत्येक मतदारांनी आपल्या गावाचा, गटाचा विकास करणाऱ्या योग्य लोक प्रतिनिधीस निवडून द्यावे जेणेकरून विकासाचा बॅकलॉग भरून निघेल असे आवाहन राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री आमदार छगनराव भुजबळ यांनी दिंडोरी तालुक्यातील जवळके दिंडोरी येथील आरोग्य उपकेंद्राच्या भूमिपूजन व जऊळके दिंडोरी जि प शाळेच्या संगणक हॉलच्या उद्घाटन प्रसंगी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे होते जऊळके दिंडोरी येथील नवीन आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन आज ना भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाली त्यानंतर जवळके दिंडोरी येथील जि प शाळेत विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक संगणक लॅब सुरु करण्यात आली असून तिचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी झाला ना भुजबळ यांनी जवळके दिंडोरी गावात तुकाराम जोंधळे यांनी केलेल्या विकास कामाचे कौतुक केले.

ग्रामीण भागातील शाळेत असा प्रयोग पहिल्यांदाच झाल्याने जोंधळे यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी असल्याचे गौरव उद्गार यावेळी काढले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जि प सदस्य भास्कर भगरे कादवा कारखान्याचे संचालक शहाजी सोमवंशी मा जि प सदस्य शंकरराव काठे रा यु कॉ तालुका अध्यक्ष शाम हिरेदिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार तालुका वैद्यकीय अधिकारी सुभाष मांडगे विस्ताराधिकारी जिभाऊ शेवाळे गट शिक्षण अधिकारी भास्कर कनोज जवळके दिंडोरी चे माजी सरपंच भारतीताई जोंधळे मधुकर केदारे जानोरी चे माजी उपसरपंच गणेश तिडके शंकरराव वाघ निवृत्ती घुमरे आंबे दिंडोरी येथील सुभाष वाघ बाबू शेठ बागमार शिवन ई पांडुरंग गडकरी मोहाडी येथील विलास पाटील लक्ष्मण देशमुख बंटी देशमुख वैभव पाटील पालखेड येथील स्वप्निल पवार काका गायकवाड अक्राळे बापूसाहेब गायकवाड वनारवाडी चे उपसरपंच दत्तू बेरे खडक सुकेने येथील मधुकर फुकट आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते