अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस या कामगार युनियनचे पुणे महानगर पालिका शाखेच्या नाम फलकाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

30

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.28फेब्रुवारी):-अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या पुणे महानगरपालिका शाखेच्या नाम फलकाचे उद्घाटन राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सुधाकर पणीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कामगार संघटनेचे पुणे महानगर पालिका शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन चिंतन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यातील मंगळवार पेठेतील श्रमिक नगर येथे करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी, पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक रफिक शेख, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक निनारिया, प्रदेश उपाध्यक्ष गुलाब चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष एल .डी वाघमारे ,प्रदेश सचिव रेखा राजे,पुणे जिल्हा महा मंत्री विनोद निनारीया, प्रदेश सचिव प्रताप सोळंकी, पुणे जिल्हा अध्यक्ष अडॅ.सुशील मंचरकर ,महामंत्री विनोद नीनारिया ,पुणे शहर महामंत्री अजय लालबेगी, पुणे शहर अध्यक्ष अजय रामानंदी , पुणे महानगरपालिका युनियनचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, औंध जिल्हा रुग्णालयाचे अध्यक्ष प्रमोद कोटियाना, पुणे कँटोन्मेंट बोर्ड व कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड चे नवनिर्वाचित अध्यक्ष वीरू घोसरे, पुणे शहर सचिव हंसराज चव्हाण, पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे अध्यक्ष नंदू वाडीया, तालुकाध्यक्ष गजानन बागिला, महिला अध्यक्ष ताई काळे अजय मेहेत्रे, भीम शेलार ,अचल वाणी , विपेश खनवे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांना करण योद्धाचे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच यावेळी पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी सुधाकर पणीकर आपल्या भाषणात म्हणाले की, या कोरोना महामारी च्या काळात सफाई कर्मचारी यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना मुळे मृत्यू पावलेला लोकांचा मृतदेह किटमधे सुरक्षित बंद करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून कोरोना नष्ट करण्याचे काम हे सफाई कर्मचारी यांनी केले. त्यांना राज्यशासन व स्थानिक प्रशासन कोणत्याही प्रकारच्या मदत निधी व कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्याकरिता पुरस्कार सुद्धा आत्तापर्यंत सफाई कर्मचाऱ्यांना दिला नाही म्हणून आम्ही आमच्या संघटनेच्यावतीने सदर सफाई कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच या कर्मचाऱ्यांच्या समस्या सभागृहांमध्ये मांडण्याकरिता कोणताही पक्षाने उमेदवारी या समाजाला दिलेली नाही. यापुढे याच्यावर गंभीर विचार करण्याची गरज आहे असे मत डाॅ. पणीकर यांनी व्यक्त केले .यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे आपल्या भाषणात म्हणाले की, सफाई कर्मचारी व वाल्मिकी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व अडी अडचणी सभागृहांमध्ये मांडण्याकरिता कॉंग्रेस पक्षाच्या वतीने एक उमेदवारी देईन त्याकरिता योग्य व्यक्तींच्या नावे द्यावे असे मनोगत व्यक्त केले. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे देखिल लवकरच खूषखबर मिळेल असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पूणे शहरचे सचिव सिंग यानी सांगितले