जातेगाव जि.प. गटातुन शैलेश तौर यांची ऊमेदवारी निश्चित?

39

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

गेवराई(दि.2मार्च):-तालुक्यातील जातेगाव जि. प. सर्कल मध्ये गत जिल्हा परिषदेचा कालावधी संपन्याआधिपासुनच जातेगाव सर्कल मधील राजकारणात सक्रिय आसलेल्या कार्यकर्त्यांच्या मना मनात शैलेश तौर यांची ऊमेदवारी निश्चित मानली जाऊ लागल्याची मोठ्या प्रमाणात चर्चा असुन या भागातील मतदार सुध्दा शैलेश तौर ऊमेदवार फायनल असल्याच्या चर्चेला दुजोरा देत असुन जनमताच्या भावनेचा कल लक्षात घेता पक्षश्रेष्टी कडुन ही अनुकूलता दिसुन येत आहे.

गेल्या आणेक दिवसापासुन जातेगाव सर्कल मध्ये जि. प. निवडनुकिच्या अनुषंगाने चर्चा होत आसतांना चर्चेत फक्त शैलेश तौरचेच नाव समोर येत असुन तरुण वरगाची एक मोठी फळी जातेगाव सर्कल जिल्हा परिषदेच्या गावा गावात आत्तापासुनच शैलेश तौरच्या प्रचार कार्यात मग्न दिसुन येत असुन या प्रचारक फळीला जेष्ठ नागरिक व महिला वर्गातुन ही प्रतिसादक दाद मिळत असुन शैलेश तौर ऊमेदवार आसावा आशी मनोकामना तरुणा सह जेष्ठ नागरिक व महिला वर्गातुन व्यक्त केल्या जात असल्याने जातेगाव जिल्हा परिषद सर्कल ओपनला सुटल्यास जनतेच्या मानातील ऊमेदवार शैलेश तौरच. ! आसे ऊदगार जागो जागी एैकन्यास मिळत आहे.
===========

जातेगाव जिल्हा परिषद गटातील युवा कार्यकर्ते शैलेश तौर यांना पक्षश्रेष्टीने ऊमेदवारी देण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब मस्के, आनिल पवार सेवा. सहकारी सोसायटी चेअरमन रामपुरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातुन केली आहे.