मंदिर संस्थानाच्या ठिकाणी शौचालय नसतील तर लाखोंच्या सभागृहाचा काय उपयोग?? – डाॅ.गणेश ढवळे

33

🔸बेलेश्वर संस्थानचा विकास;विविध कामांचा लोकार्पण सोहळा

🔹शौचालय हवे अन्यथा ८० लाखांच्या सभामंडपाचा उपयोग काय???

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.3मार्च):- दि.१ मार्च २०२२ मंगळवार रोजी रात्री ९ वाजता आ.विनायकराव मेटे यांनी बेलेश्वर संस्थान येथील सभामंडप आणि विविध गावातील भक्तांनी लोकवर्गणीतुन बांधलेल्या सुसज्ज भव्यदिव्य अशा मंडपातील जागेच्या मासकाॅक्रीटचं बेलेश्वर संस्थान मठाधिपती ह.भ.प.महादेव भारती महाराज आणि आ. विनायकराव मेटे यांच्या हस्ते लोकार्पण झालं, त्यावेळी शिवसंग्रामचे सरचिटणिस आनिल घुमरे, शिवसंग्राम ऊसतोड कामगार नेते तथा लिंबागणेश पंचायत समिती सदस्य बबन माने, शिवसंग्राम नेते सचिन कोटुळे ,महादेव बागलाने, विश्वास पाटील, बाळासाहेब जाधव, शिवसंग्राम मिडीया प्रमुख मंगेश माने आदि उपस्थित होते.

शौचालय हवे अन्यथा ८० लाखांच्या सभामंडपाचा उपयोग काय???
___
बेलेश्वर संस्थान साठी विविध पक्षाच्या नेत्यांनी आर्थिक योगदान दिलेलं आहे त्यात खा. प्रितमताई मुंढे यांनी दिलेलं सभामंडप तसेच जिल्हाध्यक्ष भाजपा राजेंद्र मस्के यांनी ५ लाख रूपयांची किचनरूम जी सध्या पुर्णत्वाकडे आहे, त्याचबरोबर मध्यंतरी आरोग्य ।संदिप क्षीरसागर यांनी मठाधिपती यांच्याशी चर्चा करून किचनसाठी १५ लाख रूपये अथवा ईतर कोणत्याही कामासाठी देण्याचं प्रत्यक्ष आश्वासन दिलं होतं त्याच पुढं काय झालं??मला नेमकं आज तरी सांगता येणार नाही, असो आ.विनायकरावजी मेटे यांच्या लोकार्पण सोहळ्यात मी मला बोलायला दिलेल्या संधीत ज्यांनी बेलेश्वर संस्थानसाठी विकास निधी दिला त्या सर्वांचेच आभार मानले ;त्याचवेळी आ.विनायकराव मेटे यांचे आभार मानुन बेलेश्वर संस्थान मध्ये माताभगिनींसाठी एकही शौचालय नाही त्यामुळेच कितीही ८० लाखाचं सभामंडप जरी बांधला तरीही तो व्यर्थच असुन महिला व पुरूषांसाठी सार्वजनिक शौचालय बांधण्यात यावे अशी विनंती केली आणि माझ्या विनंतीला मान देत भविष्यात ३-४ महिन्यात त्यांच्या आमदार फंडातुन शौचालय बांधण्याचे जाहीर आश्वासन दिले.

श्रीक्षेत्र नारायणगडाप्रमाणे विकास करण्याची आ.विनायक मेटेंची संकल्पना
____
भविष्यात तिर्थक्षेत्र ब चा दर्जा मिळवुन देत फळबाग लागवड, भाविकांसाठी राहण्याची सोय, पाणीपुरवठा योजना, रस्ते आदि योजना राबविण्यात येऊन श्रीक्षेत्र नारायणगडाप्रमाणे देवस्थान सोयीसुविधांनी सुसज्ज करण्याचा संकल्प बोलाऊन दाखवला.

आयजीच्या जीवावर बायजी वक्तव्यावरून आ.विनायक मेटे-राजेंद्र मस्के कलगितुरा भविष्यात रंगणार
___
लोकार्पण सोहळ्यात आ.विनायक मेटे यांनी बीड ते लिंबागणेश रस्ता मीच मंजुर करून आणला पण त्याचे श्रेय ईतर घेत असल्याचा आरोप करत आयजीच्या जीवावर बायजी म्हणत श्रेय घेणा-यांना मार्मिक टोला हाणत हिंमत असेल तर बेलेश्वर संस्थान ते मुळुकवाडी रस्ता करून दाखवावा असं आव्हान दिलं आज दि.२ मार्च बुधवार रोजी काल्याच्या किर्तनात हजेरी लावलेल्या जिल्हाध्यक्ष भाजपा राजेंद्र मस्के यांना ही गोष्ट जिव्हारी लागलेली दिसली कारण त्यांनी फोनवरून मला आ.विनायकराव मेटे यांनी रस्त्यासाठी दिलेलं एखादं पत्र दाखवावं असं आव्हान दिलंय बीड-भाळवणी-लिंबागणेश रस्ता त्यांच्या नेत्या तत्कालीन ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री बीड पंकजाताई मुंढे यांनीच मंजुर करून आणि निधी आणलाय असं त्याच ठाम मत आहे त्यामुळेच भविष्यात कलगीतुरा चांगलाच रंगण्याचे संकेत दिसत आहेत.