पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार! गावकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केले बेमुदत उपोषण

31

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.3मार्च):-लाखो रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणाऱ्यावर कारवाई करा, या मागणीसाठी बीड तालुक्यातील लक्ष्मीआई तांडा गावातील महिलांसह पुरुषांनी आज आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. पाणीपुरवठ्याच्या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याने गावातील पाणीप्रश्न अजूनही कायम आहे. परिणामी गावात महिलांना हातपंपावरून पाणी भरण्याची वेळ आली आहे. गावातील पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गावच्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी संगनमताने गावातील विकास कामांचा निधी हडप केला आहे.

यामुळे गावातील विकास कामांच्या योजनाचा निधी, फक्त कागदोपत्री खर्च करण्यात आला आहे. हा आरोप करत गावकऱ्यांनी आंदोलन केला आहे. यासंदर्भामध्ये सरपंचाला विचारले असता, नागरिकांना दहशत दाखवून खोटे गुन्हे दाखल करत आहेत. त्यामुळे सरपंच पतीवर कठोर कारवाई करावी, अशी देखील मागणी तांड्यावरील ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच जर हा प्रश्न मार्गी नाही लागला, तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.