नगरसेवक विशाल इंगळे यांचा सत्कार

31

✒️कारंजा( घा)प्रतिनिधी(पियुष रेवतकर)

कारंजा(दि.8मार्च):-समाज ,जात व धर्म यांच्या पल्याड जाऊन सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी सदैव कटीबद्ध असलेले सामाजिक कार्यकर्ते व नुकत्याच पार पडलेल्या कारंजा नागरपंचायत निवडणुकी मध्ये नगरसेवक म्हणून निवड झालेल्या विशाल इंगळे यांच्या सामाजिक कार्याचा संभाजी ब्रिगेड कारंजा तालुका कमिटी तर्फे सत्कार करण्यात आला .

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कारंजा येथे पार पडलेल्या या सोहळ्यात संभाजी ब्रिगेड नेते राहुल काळे यांच्या हस्ते विशाल इंगळे यांना सन्मानित करण्यात आले .अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सुभाष अंधारे ,प्रमुख अथिती संजय यावले ,राजेंद्र इंगळे ,प्रवीण भिसे ,पियुष रेवतकर ,मनोज वानखेडे उपस्थित होते .