नरसीच्या श्याम गायकवाड गायकांचा आवाज दिल्लीत गाजणार

32

✒️माधव शिंदे(मो:-७७५७०७३२६०)नांदेड,जिल्हा प्रतिनिधी

नांदेड(दि.8मार्च):-जय भारत माता सेवा समितीच्या वतीने नवी दिल्ली.जय भारत माता सेवा समिती संस्थापक अध्यक्ष ओम श्री. श्री.श्री. हवा मल्लिनाथ महाराज यांनी आयोजित करण्यात आलेल्या देशभक्ती कार्यक्रमात नरसी येथील गायक तथा पत्रकार श्याम गायकवाड यांना गायणाची संधी मिळाली असुन अल्पकाळातच आपल्या मधुर वाणीने ग्रामीण भागातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या कलाकारास दिल्लीत गायनाची संधी मिळाल्याने गायकवाड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

बालपणापासूनच गायनाची आवड असलेले श्याम सुंदर गायकवाड गेल्या काही दिवसापासून गायनाची शिक्षण घेत होते देशभक्तीपर अनेक गीते त्यांनी गायली आहेत. याबरोबरच कवाली हिंदी गीते देखील त्यांनी गायली आहेत. पत्रकारिता करत असताना आपल्या आवडीचे क्षेत्र असलेल्या गाण्याकडे वळल्याने नायगाव तालुक्यात एक चांगला गायक म्हणून ते सर्व परिचित झाली आहेत.

दिनांक २३ रोजी नवी दिल्ली येथे शहीद दिनानिमित्त जय भारत माता सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष ओम श्री श्री श्री हवा मल्लिनाथ महाराज यांच्या वतीने देशभक्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात श्याम गायकवाड देशभक्तीपर गीते गाणार आहेत नरसी सारख्या ग्रामीण भागातील गायकांचा आवाज हातात दिल्लीतही गुजणार असुन यानिमित्त श्याम गायकवाड यांचे मित्रपरिवारानी अभिनंदन केले आहे.