जिल्हा परिषद शाळा विठ्ठलवाडा येथे संपन्न झाला जागतिक महिला दिन सोहळा

114

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.9मार्च):-जि प उ प्राथमिक शाळा विठ्ठलवाडा येथे मान अंकुर मल्लेलवार सरपंच ग्रामपंचायत विठ्ठलवाडा यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी महिलांच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. मेणबत्ती स्पर्धा, बॉल बास्केट मध्ये टाकणे, सुई दोरा, संगीत खुर्ची, अडथळा शर्यत (आई मुलाची जोडी),भाषण स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विशेष म्हणजे वर्ग 1 ते 7 च्या सर्व महिलांनी सहभाग घेतला. प्रत्येक स्पर्धेतून दोन स्पर्धकांना विजेते घोषित करण्यात आले. विजेत्या स्पर्धकाना ग्रामपंचायत विठ्ठलवाडा कडून बक्षिसे देण्यात आले.

बक्षीस वितरण सोहळ्यात ग्रामपंचायत सरपंच अंकुर मल्लेलवार,ग्रामपंचायत सदस्य विनोद मेश्राम, छायाताई लखमापुरे,सोनिताई गौरकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती च्या उपाध्यक्ष सोनिका देवतळे,छाया लडके, ज्योत्स्ना कोवे, जि प शाळेचे उ क्षे मुख्याध्यापक मान छोटुभाई आवडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक गौतम उराडे यांनी केले तर बक्षिस वितरण सोहळा कार्यक्रमचे नियोजन व संचालन विषय शिक्षक विठ्ठल गोंडे यांनी केले.

कार्यक्रम स्थळी ग्रामपंचायत विठ्ठलवाडा कडून पूर्ण विद्यार्थ्यांना व महिलांना चहा,नासता,पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 7 वी ची विद्यार्थ्यांनी समीक्षा विद्ये व माही दुर्गे हिने केले तर पाहुण्यांचे आभार विठ्ठल गोंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उमरे ,कोकुलवार ,गेडाम ,मोरे,तसेच शिक्षणदान उपक्रमाचे आयोजक संजीवनी फरकडे व राहुल शेंडे यांनी सहकार्य केले. उपस्थित सर्व महिलांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.