ट्रक व दुचाकीच्या अपघातात दोन गंभीर जखमी

31

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि 9मार्च):-दि. ८ मार्च मंगळवार रोजी दुपारी नकोडा येथील वर्धा नदीच्या पूल समोरील वळण रस्त्यावर ट्रक क्र. एम.एच ३४ बी.झेड ४०२३ हा ट्रक खाली करून वेकोली खाणीच्या पैंनगंगा कोळसा खाणीत कोळसा भरण्यासाठी जात असतांना दुचाकी वाहन क्र. एम.एच ३४ बी.जे ८०१२ वर जितेंद्र उत्तम झा (३८) व तरुण ठाकूर दयाल कुशवाह ( ५२) दोघेही रा. भद्रावती हे दोघेही दुचाकीवर बसून पैंनगंगा कोळसा खाणीतून ठेकेदारीचे काम करून नकोडा मार्गे भद्रावती कडे जात असतांना ट्रक चालकाने जोरदार दुचाकीला धडक दिली यात दुचाकीचा चेंदामेंदा झाला व दोघेही गंभीर जखमी झाले जखमी अवस्थेत त्यांना चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले.

पोलिसांनी कलम २७९, ३३८,१८४ गुन्हा दाखल केला असून अपघातग्रस्त दुचाकी व ट्रकला घुग्घुस पोलीस ठाण्यात जमा केले असून ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे. पुढील तपास घुग्घुस पोलीस करित आहे.