आम आदमी पार्टीची आढावा बैठक पार पडली

32

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.10मार्च):-:-जिवती नगरपंचायतीच्या बाजूला आबेंडकर भवनात आम आदमी पार्टीची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकित समोर येणाऱ्या आगामी निवडणुक ग्रामपंचायत- पंचायत समिती-जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली येणारे सर्व निवडणूक सामान्य जनतेला सोबत घेऊन लढू असे ठरविण्यात आले. सर्व नवनियुक्त कार्यकर्त्याचे सत्कार करण्यात आले पंजाब राज्यात बहुमताने आम आदमी पार्टीला निवडून दिलेल्या बद्दल पंजाबच्या जनतेचे आभार मानले.

या वेळी उपस्थित सुनील राठोड तालुका अध्यक्ष, सचिव गोविंद गोरे, संघटन मंत्री जिवन तोगरे, उपाध्यक्ष नितेश करे, राजुभाऊ दुधाटे कोषाध्यक्ष, गोपाळ मोहिते श्रीराम सानप मकदुम भाई शेख अरविंद भाऊ चव्हाण ज्ञानेश्वर राठोड अविनाश जाधव बालाजी मस्के संतोष पोले सामाजिक कार्यकर्ते कृष्णाजी चव्हाण आदिची उपस्थिती होती