भारतीय जनता पार्टी तर्फे महिला दिन साजरा

32

✒️कारंजा(घा)प्रतिनिधी(पियुष रेवतकर)

कारंजा(घा)(दि.11मार्च):-आर्वी विधानसभेचे आमदार दादाराव केचे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी महिला आघाडी कारंजा शहर तर्फे 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्य अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ कारंजा येथे भव्य कार्यक्रम घेण्यात आला .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हापरिषद अध्यक्ष सरिता गाखरे यांनी भूषविले , कार्यक्रमाच्या अध्यक्षा जिल्हापरिषद बांधकाम सभापती नीता गजाम ,माजी पंचायत समिती सदस्य रंजनाताई टिपले ,कारंजा नगरपंचायत च्या नगरसेविका योगीता कदम ,नगरसेविका रंजनाताई ढबाले ,उषा चौहान ,रमाताई दुर्गे ,कावडकर ताई ,वैशाली सरोदे ,मीनाक्षी भांगे उपस्थित होत्या .पाहुण्यांनी आपल्या भाषणातून स्रियांच्या कर्तृत्वा विषयी मार्गदर्शन केले .

या कार्यक्रमात जोडीदाराची साथ नसताना ज्यांनी आपले आयुष्य कणखरपणे कुटुंबाला सांभाळून संसार यशस्वी केला अश्या महिलांचा शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती यावले यांनी केले तर आभार मीनाक्षी भांगे यांनी मानले .या कार्यक्रमात विशेषतः सारिताताई गाखरे व रंजनाताई टिपले यांचा सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व महिला आघाडीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले .