कैलास नगर मनोरंजन केंद्र येथे जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला

84

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.11मार्च):-दि.१० मार्च गुरुवार रोजी घुग्घुस येथून काही अंतरावर मुगोली येथील कैलास नगर मनोरंजन केंद्र येथे आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला.आरोग्यासाठी योगा नियमितपणे करणे किती लाभदायक आहे महिलांनी योगाचे नृत्य सादर केले.

जागतिक महिला बद्दल प्रबोधन व मार्गदर्शनातून भाषण करून कार्यक्रम संपन्न करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे आलेल्या सरपंच ज्योती सुनील माथुलकर, रेखा भगवत गिल मॅडम,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शकिला खान,वंदना सातपुते, योगा शिक्षिका वनिता मोहन ठाकरे व इतर अनेक महिला उपस्थित होते.