संजयनगर येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान संपन्न

33

🔹भारतातील प्रथम महिला मुख्याध्यापिका व शिक्षिका सावित्रीमाई फुले – लक्ष्मणराव पाटील

✒️पी.डी.पाटील(धरणगाव प्रतिनिधी)

धरणगाव(दि.12मार्च):-येथील संजयनगर परिसरात महात्मा फुले मित्र मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त संजयनगर परिसरात अभिवादनपर लक्ष्मणराव पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले. तत्पुर्वी, संत शिरोमणी सावता महाराज, कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहूजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गोपाल आण्णा माळी यांनी केले.

तदनंतर प्रमुख व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी सावित्रीमाईंच्या जीवनप्रवास सांगत असताना माईंचे ज्योतिबांशी विवाह, शिक्षणाला सुरुवात, पहिली मुलींची शाळा, मुलींना शिक्षण देण्याचा प्रसंग, माईंनी लिहिलेली ग्रंथ, काशीबाई नावाच्या विधवा महिलेचे बाळंतपण, डॉ.यशवंत यांना आईचे नाव देणे, मनुवाद्यांपासून झालेला त्रास पासून ते प्लेगच्या आजाराने माईंची प्राणज्योत मालवली पर्यंत इत्यंम्भूत माहिती उपस्तितांना सांगत व्याख्याते पाटील यांनी व्याख्यानाचा शेवटी त्याकाळी विधवांना बोडखे करण्याचे काम धर्म मार्तंड करून घेत असत. माई व तात्यासाहेबांनी न्हावी बांधवांचे मत परिवर्तन करून त्यांचा संप घडवून आणला आणि विधवांचे मुंडन करण्याची रुढी बंद केली .अशी विचारांची साखळी मजबूत आज सुद्धा केली पाहिजे. स्त्रियांना बंधनातून मुक्त करण्याची गोष्ट फुले दाम्पत्यांनाच सुचते, तुम्हा आम्हाला का नाही.?

आपण सर्वांनी तात्या व माईंची प्रेरणा घेऊन कृतीशील परिवर्तनाचा प्रवास केला पाहिजे असे सांगत सावित्रीमाईं व महापुरुषांच्या प्रतिमेस व विचारांना वंदन करून अभिवादन केले.अभिवादनप्रसंगी विचारमंचावरील जेष्ठ पत्रकार आर.डी.महाजन, पत्रकार पी. डी.पाटील, गोरखनाथ देशमुख आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी असंख्य माता-भगिनी, युवक-युवती उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार सत्यशोधक हेमंत माळी सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय नगर परिसरातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.