माधुरी मगर-काकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित

117

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.12मार्च):-लिटिल हेल्प ट्रस्ट, शैक्षिक आगाज, रेडिओ मेरी आवाज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०८ मार्च २०२२ रोजी जगभरातील १०१ महिलांना सन्मानित करण्यात आले.दौंड, जिल्हा पुणे येथील सौ. माधुरी मगर- काकडे यांना हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्रदान करण्यात आला आहे.गझल, कविता, हायकू, बालनाट्यलेखन-दिग्दर्शन, कथा, लेख, निबंधलेखन अशा साहित्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षिका माधुरी मगर-काकडे यांना शैक्षणिक कार्यासाठी हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्राप्त झाला आहे.

भारताचे माजी पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतणी आणि अटल फाउंडेशनच्या संस्थापिका, अध्यक्षा माननीय माला वाजपेयी- तिवारी, पद्मश्री पुरस्कार प्राप्त माननीय माधुरी बर्थवाल, शैक्षिक आगाज संस्थेच्या प्रमुख माननीय स्मृती चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

सुमारे ३६ देशांमध्ये प्रसारण होणाऱ्या रेडिओ मेरी आवाजच्या निवेदिका नीलमजी तसेच लिटिल हेल्प ट्रस्टचे अधिकारी व शैक्षिक आगाज संस्थेचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जर्मनी, दुबई, ओमान, इंग्लंड, रशिया, जपान, भारत इत्यादी देशातील निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत जगातील वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिभावान महिलांना सन्मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन वैशिष्ट्यपूर्ण होते.