पुसदमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घघाटन

39

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.13मार्च):-वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे अनावरण तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव व संपूर्ण तालुका कार्यकारिणीच्या अथक परिश्रमातून धुमधडाक्यात करण्यात आले.त्याप्रसंगी तालुक्यातील विविध जाती समूहातील तरुणांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश घेतला, तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव यांनी संपूर्ण तालुक्यात वंचित बहुजन आघाडी चा झंझावात निर्माण केल्यामुळे, समाजातील दुर्बल घटकांच्या सामाजिक समस्यांसाठी अहोरात्रपणे लढा निर्माण केला, त्यांच्या सक्रिय कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन आपल्याला फक्त वंचित बहुजन आघाडीच न्याय देऊ शकते, असा विश्वास निर्माण झाल्यामुळे जनतेला वंचित बहुजन आघाडी कडून अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

म्हणुनच दिवसेंदिवस तालुक्यात पक्ष भक्कम पणे उभा राहत आहे,
समाजातील अनेक समस्या… पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, बांधकाम विभाग, पंचायत समिती, कृषी विभाग, नगरपरिषद,
अशा अनेक कार्यालयात ग्रामीण व शहरी भागातील लोकांना हेलपाटे मारूनही न्याय मिळत नाही, त्यांचा लढा लढण्यासाठी
वंचित बहुजन आघाडीचे भव्य दिव्य व सुसज्य जनसंपर्क कार्यालय उभारण्यात आले..त्याप्रसंगी कार्यालयात एकच गर्दी झाली, प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत कार्यालयाचे थाटामाटात अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शरद वसतकर (सर) यवतमाळ जिल्हा प्रभारी (निरीक्षक) हे होते,कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय गायकवाड साहेब जिल्हाध्यक्ष यवतमाळ,प्रमुख पाहुणे डी.के दामोधर, जिल्हा महासचिव प्रशांत उर्फ जोंटी विनकरे जिल्हा महासचिव,सतीश खाडे जिल्हा कोषाध्यक्ष,ऊकेस्वर मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष,बिशर कुरेशी तालुकाध्यक्ष दारव्हा,शेख अश्पाक शेख आगा तालुकाध्यक्ष महागाव,उमरखेड तालुकाध्यक्ष संतोष जोगदंडे,नगरसेवक संबोधी गायकवाड, मौलाना सय्यद हुसेन, दीपक पद्मे, सचिन भाऊ सूर्यवंशी, प्रकाश खिल्लारे, विशाल भाऊ डाके, सद्दम्म जाधव, प्रशांत सरोदे, किशोर कांबळे, नितीन सरोदे, उद्धव कराळे, रवी चौरे, माधवराव मनवर, कृष्णा दांडेकर, गौतम वाहुळे, शुभम खंदारे, माधव सोनुने, प्रीतम आळणे,धम्मवती वासनिक महिला जिल्हाध्यक्ष, पद्माताई दिवेकर, रेखाताई पाईकराव, वंदना भवरे, विद्या नरवाडे, संध्या काळे, सीमाताई असोले, शिरसाट ताई हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मार्शल विनोद बरडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत कांबळे यांनी केले.