वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्ता बैठक संपन्न

34

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.15मार्च):-आगामी काळात होऊ घातलेल्या जि.प व पं.स च्या निवडणुका संदर्भात वंचित बहुजन आघाडी तालुका ब्रम्ह्पुरी च्या वतीने दि.14 मार्च रोज सोमवार ला शासकीय विश्रामगृह ब्रम्ह्पुरी येथे कार्यकर्ता बैठक पार पडली.या बैठकीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष मा.भुषणभाऊ फुसे ,प्रमुख अतिथि जिल्हा सदस्य सुखदेव प्रधान सर , जिल्हा सल्लागार डॉ प्रेमलाल मेश्राम तसेच ठाकुर साहेब यांनी संघटनात्मक मार्गदर्शन केले .तालुक्यात पक्षसंघटन वाढविणे , गांव तिथे शाखा तयार करणे , बूथ कमिटी गठित करुन संघटनात्मक जबाबदारी देणे, जिल्हा परिषद सर्कलनुसार निरीक्षक नेमने तसेच विस्तारित तालुका कमिटी गठित करणे व संभाव्य उमेदवारांशी संवाद साधने यावर भर देण्यात आला .

तालुक्यात संपुर्ण जागा पुर्ण ताकतीने लढविण्यात याव्यात तसेच वंचित बहुजन आघाडी हा पक्ष विशिष्ट एका समूहाचा नसुन तो सर्वसमावेशक अश्या स्वरूपाचा आहे आणि यामध्ये एस सी, एस टी , ओ बी सी घटकातील कार्यकर्त्यांनी मनुवादि पक्ष्यांच्या जाचातून मुक्त होऊन जास्तीत जास्त वंचित मध्ये सहभाग घेऊन आपली हक्काची सत्ता स्थापन करावी असे मत जिल्हाध्यक्ष भुषणभाऊ फुसे यांनी व्यक्त केले .मार्गदर्शनानंतर नवनियुक्त तालुका महिला पदाधिकाऱ्यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले .शिवाय श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेत्रुत्वावर विश्वास ठेऊन अनेक कार्यकर्त्यांनी भाजपा व कॉंग्रेस सोडुन मा.जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला .

तालुका कार्यकर्ता बैठकीचे आयोजन तालुका महासचिव लिलाधर वंजारी यांनी केले तर सूत्रसंचालन उपाध्यक्ष अनिल कांबळे यांनी केले व आभार उपाध्यक्ष नरेंद्र मेश्राम यांनी मानले. यावेळी अश्व्जीत हुमने , प्रफुल्ल ढोक, निहाल ढोरे , डॉ विलास मैंद , सुरेश बागडे , अनंतकुमार मेश्राम , प्रकाश रामटेके , प्रशांत खोब्रागडे , चण्द्रमणी चहान्दे , सुशील बनसोड , दिक्षित गजभिये , प्रमोद आसटकर , सचिन दोनाडकर , बाळकृष्ण चहान्दे , पध्मिनि धनविजय , मनीषा उमक, सुकेषनी बनसोड , योगीता रामटेके , वंदना कांबळे व ईतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .