घुग्घुस काँग्रेसतर्फे प्रकाशभाऊ देवतळे यांचा वाढदिवस साजरा

34

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.16मार्च):- 16 मार्च रोजी घुग्घुस काँग्रेसतर्फे चंद्रपूर काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ देवतळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.घुग्घुस येथील काँग्रेसच्या नेत्यांनी चंद्रपूर काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ देवतळे यांच्या चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली व केक कापून वाढदिवस साजरा केला तसेच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी घुग्घुस येथील काँग्रेसचे नेते जावेद सिद्दीकी
गणेश उईके,शेखर तंगडपेल्ली,सोनू गुडला,अक्षपाक शेख, साजीद शेख कॉंग्रेस म्हातारदेवीचे अध्यक्ष सिद्धार्थ बोरकर धानोराचे सरपंच वासाडे,ग्रामपंचायत पांढरकवडा चे सरपंच सुरेश तोतडे, म्हातारदेवीचे माजी ग्रामपंचायत सरपंच व लॉयड्स मेटल कामगार संघटना चे कामगार उपस्थीत होते