आशा वर्करचे विवीध प्रश्न अधिवेशनात मार्गी लावणार – आम. भांगडीया

40

🔹आशा दिवस कार्यक्रम

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.16मार्च):-दोन वर्षं कोवीडच्या काळात कोवीड योद्धा म्हणून आशा वर्कर यांनी काम सांभाळले. यात काही आशा वर्कर मृत्यु कोवीडमुळे झाला. आशा वर्कर नी केलेल्या कामाची दखल सरकारने घेतली आशांच्या आशा पल्लवीत झाल्या मात्र इतके दिवस होवूनही आशा वर्कर यांनी कोवीडच्या काळात केलेल्या कामाचा मोबदला अजुनही आशा वर्कर यांना मिळाला नाही. यात सरकार चा नार्केते पना दिसुन येत असुन आशाचे विवीध प्रश्न अधिवेशनात मार्गी लावनार असल्याचे कार्यक्रमाच्या उद्दघाटन भाषणात आमदार किर्तीकुमार भांगडीया बोलत होते.

तालुका आरोग्य विभाग चिमूर च्या वतीने स्वातंत्र्य संग्राम सैनिक बालाजी रायपूर सभागृह चिमूर येथे आशा दिवस कार्यक्रम सोमवारला पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे उद्दघाटक चिमूर विधान सभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया, कायक्रमाच्या अध्यक्षा पंचायत समीती च्या सभापती लता पिसे, कार्यक्रमाचे प्रमुख तहसीलदार बुरांडे, तालुका आरोग्य अधिकारी ललीत पटले, सिडीपीओ पुनम गेडाम, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष गट नेता डॉ सतिष वारजूकर, जिल्हा परिषद सदस्य मामीडवार, पंचायत समितीचे उपसभापती रोशन ढोक, कार्यक्रम सहायक किशोर गेडेकर, आशा पर्यवेक्षक फानुषी कुरेशी, निखारे, पाचभाई, मेश्राम, धनविजय, रंदये, येळणे, रामटेके, गायकवाड, ढोक, गजभे, हिवरे, शिवरकर, सविमुन, गोवर्धन आदी उपस्थीत होते.

कार्यक्रमादरम्यान आशांनी डान्स स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व संगित खुर्ची स्पर्धा घेतली या कार्यक्रमाला तालुक्यातील बहुसंख्य आशा यांची उपस्थीती होती. प्रास्ताविक ललीत पटले, संचालन तृप्ती थुटे,आभार दुर्गा रोहनकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गट प्रर्वतक व आशा वर्कर यांनी मेहनत घेतली.