सिरसाळा जि.प.उर्दू शाळेच्या शालेय शिक्षण समितीसाठी अध्यक्षपदी फिरोझ खान पठाण तर उपाध्यक्ष रफिक शेख यांची निवड!

28

✒️अतुल बडे(सिरसाळा प्रतीनिधी)

सिरसाळा(दि.20मार्च):-येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेची शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक दि.१९/३/२०२२ शनिवार रोजी पार पडली.पालकां मधून निवड झालेल्या तेरा सदस्या पैकी फिरोझखाॅन करीमखाॅन पठाण यांची अध्यक्ष पदी तर उपाध्यक्ष पदी शेख रफिक शेख लहाबु यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.शेख रफिक शेख लहाबू बिनविरोध विजयी झाले आहेत.पठाण इम्रान खाजा, रफिकखाॅ बाबाखाॅ पठण,पठाण अहेमद ल्याखत,बागवान रफिक अहेमद, नासेरखान इब्राहिम खान,पठाण अफ्रीन सलमान,शेख कौसर रहिम,शेख फातिमा रफिक,शेख अफसाना जैनोद्दीन,मणियार तब्बसुम लतीफ,कुरेशी अफ्रीन मस्तान यांची सदस्य पदी विजयी होऊन निवड झाली आहे सकाळी ११:३० वाजेपर्यंत निवडणुक प्रक्रियी चलली होती. ह्या शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती निवडणूकीच्या निरीक्षक म्हणून मुख्याध्यापक उरूजखान सर, केंद्रप्रमुख कांबळे सर,यांनी तर निवडणूक सहाय्यक म्हणून नईम सर, साबेर सर यांनी कार्य केले.

नवनिर्वाचित समिती चे उपस्थित प्रतिष्ठीत नागरिकांनी सत्कार व सन्मान करुन पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी सिरसाळा ग्रामपंचायत चे उप सरपंच इम्रानखान पठाण, सिरसाळा पञकार संघाचे सचिव जावेद पठाण, शेख नासर, (दादा) माजी अध्यक्ष शेख नदीम भाई,आक्रम खान पठाण, माजीद खान,मौ.अख्तर, नुर इनामदार सय्यद गजम, इम्रान इनामदार, शेख सिराज (देशमुख) अनवर पठाण,नदीम कुरेशी,खदीर अतार,गफार अतार, जमील अतार,जब्बार खान सत्तार खान पठाण , (भुट्टू) सय्यद जामीन, असद सय्यद, शेख फेरोज हारून,शेख रहिम,आदी सह अनेक जण उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंदानी परिश्रम घेतले.