नाशिक शहरात कोरोना नियम हटवण्याबाबद दोन दिवसांत निर्णय घ्या – पालकमंत्री छगन भुजबळ

56

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.20मार्च):- महाराष्ट्र राज्यातील कोरोना प्रादुर्भाव ओसरत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर विविध शहरांतील निर्बंध शिथिल केले जात आहे. ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज आढावा बैठक घेऊन नाशिक शहरातील निर्बंध कमी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती भुजबळ यांनी दिली आहे. सोमवारी नवीन नियमावली प्रशासनाकडून जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे नाशिककरांना मंगळवारी रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा करता येणार आहे.

रहाडीत रंगपंचमी साजरी करण्यासाठी तयारीला लागा, असे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पालकमंत्री भुजबळ यांच्यासमोरच मंडळांना सांगितले. त्यामुळे शहरात रंगपंचमी जल्लोषात साजरी होणार आहे. कोरोना प्रादुर्भावाबाबतचे विविध निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी डीजेबाबत मात्र सोमवारी निर्णय होणार आहे.

नियमावली सोमवारी जाहीर होणार पोलीस आयुक्तांसह प्रशासनातील इतर अधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत आज काही निर्णय घेण्यात आले. मुंबई-पुण्यासह राज्यातील 12-15 जिल्ह्यांमध्ये 100 टक्के निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधीलही निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी केली जात होती. त्यामुळे मी आजच्या बैठकीत पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा केली असून निर्बंध हटवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येत आहे. याबाबतची नियमावली सोमवारी जाहीर केली जाईल. सण साजरे करण्यासाठी निर्बंध शिथिल करण्यात येत असले तरी नागरिकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर कायम ठेवावा.
– छगन भुजबळ, पालकमंत्री, नाशिक