मुस्लिम पर्सनल ला भारतात शांतता आणि अखंडता साठी प्रयत्न करत आहे – मौलाना उमरेन

52

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.20मार्च):-येथील दिनांक १७ मार्च २०२२ रोजी बरकत नगर चौक येथे अल-जामिया राशिदा लिबिनातुल मुस्लिमीन च्या ४ विद्यार्थ्यांनी ‘आलेम’ हि धार्मिक पदवी पुर्ण केलेल्या सनद (पदवी ) वितरण सोहळा आणि “इसलाह-ए-मुआशरा” च्या कार्यक्रमात आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून इस्लामिक नामवंत धर्मगुरू व ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सेक्रेटरी मौलाना मुफ्ती उमरेन महफुज रहमानी आले होते.मौलाना यांनी आपल्या भाषणात सध्या देशात जे घडत आहे त्याच्यावर आपले मनोगत व्यक्त केली.

मुस्लिम पर्सनल ला भारतात शांतता आणि अखंडता साठी प्रयत्न करत आहे आणि सध्या मुस्लिम समाजाचे युवा वर्ग मोबाईल च्या गैरवापर करत आहे त्याच्यावर ही मौलाना यांनी सांगितले की हे मोबाईल जितका तुम्ही दुरुपयोग करेल तितकाच ते तुमच्यासाठी धोकादायक आहे मोबाईल मध्ये आज युवक जे मटका बिंगो खेळत आहे आणि काही लोक कारोबार करत आहे त्यांच्यावरही मौलाना ने सांगितले इस्लाम धर्मामध्ये मटका, बिंगो आणि व्याज हे हराम आहे. त्यानंतर मौलाना म्हणत होते मुस्लिम समाज यांनी शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. या कार्यक्रमाचा शेवटी मौलाना शेख तैयमुर मल्ली यांनी येणाऱ्या सगळे वक्ते आणि लोकांच्या आभार व्यक्त केले