गेवराईत शिवसेनेचा विराट मेळावा

32

🔸”बदामराव पंडित म्हणजे गरिबांचा हिरा”– खा ओमराजे निंबाळकर

🔹”बोलणे कमी आणि काम जास्त म्हणजेच बदामराव पंडित”– माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

🔸सामान्य जनता हीच माझी आणि शिवसेनेची ताकद — माजी राज्यमंत्री बदामराव पंडित

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.24मार्च):- शिवसेनेच्यावतीने शिवसंपर्क अभियान अंतर्गत घेतलेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यास विराट स्वरूप आले होते. गेवराई तालुक्यातल्या गाव,वाडी, वस्ती, तांड्यावरील शिवसैनिक स्वखर्चाने मेळाव्याला उपस्थित राहिला होता. बेदरे लॉन्सच्या भव्य सभागृहात झालेल्या मेळाव्यात, उपस्थित शिवसैनिकांनी घोषणांनी अक्षरशः सभागृह दणाणून सोडले.

उपस्थित शिवसैनिकांना शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, माजी राज्यमंत्री बदामराव आबा पंडित, अजित भंडारी, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्याला मुंबईहून आलेले विजय देशमुख, विलास राणे, जिल्हा समन्वयक युधाजित दादा पंडित, बाळासाहेब आंबुरे, युवानेते रोहित भैय्या पंडित, युवानेते अभिजीत पंडित, किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, जिल्हा संघटक नितीन धांडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख ॲड संगीताताई चव्हाण, माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या विराट मेळाव्याचे सूत्रसंचालन शिवसेना तालुकाउपप्रमुख दिनकर शिंदे यांनी केले. मेळाव्यास जिल्हा परिषद सदस्य युवराज डोंगरे, पंचायत समिती शिवसेना गटनेते बापूराव चव्हाण, सदस्य महादेव औटी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शेख एजाज, बबलू खराडे, तालुकाप्रमुख कालिदास नवले, शहर प्रमुख शिनुभाऊ बेदरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख शेख सिराज, तालुका प्रमुख गोविंद दाभाडे, किसान सेना तालुका प्रमुख सतीश सपकाळ, महिला संघटक ऍड उज्वलाताई भोपळे, मधुकरराव मस्के, सोशल मीडिया प्रमुख अशोक नाईकनवरे, सर्कल प्रमुख राजाभाऊ नाडे, शेख नविद यांच्यासह जिल्हा व तालुका शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि शिवसैनिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.