राजेंद्र नाईक यांनी ,आपल्या वडिलांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रम निमित्ताने बुध्द विहारास १० हजार रूपये दिले दान

28

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.26मार्च):-येथील मंगलमूर्ती नगर येथील राजेंद्र शामराव नाईक यांचे वडील स्मृतीशेष शामराव अभिमान नाईक यांचे दिनांक १३ मार्च २०२२ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी वृद्धपकाळाने दुःख निधन झाले.त्याप्रित्यर्थ त्यांचा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम काल दिनांक २५ मार्च २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता. बौद्ध धम्माच्या रीतिरिवाज प्रमाणे वंदनीय भन्ते कमाल धम्मो यांच्या हस्ते सर्व पूजा करण्यात आली .

बौद्ध धम्मामध्ये *दानपारमिता* सांगितली आहे ,दान करणे हे अतिशय कुशल कर्म आहे .याच बौद्ध धम्माच्या शिकवनीचे अनुसरून करून राजेंद्र शामराव नाईक यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ संबोधी बुध्दविहार लक्ष्मीनगर येथे आपल्या संपूर्ण परिवारासह उपस्थित राहून विहाराच्या पायऱ्या बांधकाम करण्याकरीत रुपये 10,000 हजार चा धनादेश लक्ष्मी नगर येथील नत्थु वाहुळे , सुरेश विणकरे, रंगराव बनसोड , नरेंद्र पाटील सर , राजेश ढोले,सुरज पाईकराव , बाळू ढेम्बरे , समाधान कांबळे सर व प्रमुख उपस्थिती विठ्ठलराव खडसे सर ( अध्यक्ष धम्मक्रांती प्रज्ञापर्व 2022 ) यांच्याकडे सुपूर्द केला.

आपल्या वडिलांनी आयुष्यभर जी धम्माची शिकवण दिली त्याप्रमाणे नाईक परिवारातील सर्व सदस्यांनी अनुसरण केले व समाजापुढे एक आदर्श निर्माण केला .असे मत उपस्थित सर्व लक्ष्मीनगर येथील उपासक यांनी व्यक्त केले, व अश्याप्रमाणे समाजातील इतर धम्मबांधव यांनी नाईक परिवाराचा आदर्श घेऊन बौद्ध विहारास दान द्यावे अशी भावना व्यक्त केली.यावेळी नाईक परिवारातील शामराव नाईक यांच्या पत्नी मनकर्णा नाईक, राजेंद्र नाईक , मनोज नाईक , पद्मिनी नाईक ,पुष्पा नाईक, रूपेश नाईक, अक्षय नाईक उपस्थित होते.