महात्मा फुले जीवन गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

25

✒️औरंगाबाद(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

औरंगाबाद(दि.26मार्च):-शब्दगंध समूह प्रकाशन, विद्यार्थीप्रिय शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य, औरंगाबाद व ग्रंथमित्र युवा मंडळ, औरंगाबाद आयोजित भव्य पुस्तक प्रकाशन सोहळा, महात्मा फुले जीवन गौरव पुरस्कार सोहळा,महिला गौरव सन्मान सोहळा अशा त्रिवेणी संगम असलेल्या कार्यक्रम मोठ्या दिमाखात मौलाना आझाद रिर्सच सेंटर या सभागृहात मोठ्या उत्साहात रविवार,दि.२०मार्च २०२२ रोजी संपन्न झाला.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले मा. डॉ.पी.एन.पठारे (भागीरथी माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय,नालेगाव.) तसेच प्रमुख उपस्थितीत मा.जी.बी.जगताप तसेच या कार्यक्रमाला उद्घाटक मा.संगीता जामगे,(साहित्यिक) परभणी , प्रमुख अतिथी मा. ग्लोरिया डिसोजा (अभिनेत्री), मुंबई
मा.माधुरी देवरे, (शब्दगंध समूह प्रकाशन च्या आजीवन सदस्य) नाशिक , विजय त्रिभुवन, दिलीप पठारे, वैजापूर तर या मंगलप्रसंगी भव्य पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. त्यात कवयित्री सौ.रेखा मराठे यांचा चतुरंग काव्यसंग्रह, कवयित्री सौ.रुपाली पाटील यांचा स्वप्नरुप, सौ.सुवर्णा तावरे, सांगली यांचा काव्यस्पर्श काव्यसंग्रह, तर लेखक अनिल मनोहर यांची पायपीट कादंबरी, संपादक संदिप त्रिभुवन यांचे १००० कवींचे १००० कविता हा संपादकीय काव्यसंग्रह, संपादिका सौ.रमा त्रिभुवन यांचा महिला गौरव सन्मान स्मरणिका प्रकाशित, कवी सुरेश भोपी यांचा वज्रमूठ काव्यसंग्रह, ले.माधुरी खडके यांची वडीलांच्या स्मरणार्थ स्मरणिका पुस्तिका, ऋतुजा पाटील यांची पेटलेला वणवा कादंबरी, आणि प्रतिभा गजरमल यांचा वेल काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला.

यावेळी महिला गौरव सन्मान सोहळा व महात्मा जीवन गौरव सन्मान सोहळा इत्यादी पुरस्कार सोहळा संपन्न झाला. महिला गौरव सन्मान सोहळ्यात कु पल्लवी दाभाडे, यवला, रेखा मराठे,जळगाव,मा.सुनिता तागवान, गडचिरोली, उज्ज्वला कोल्हे, अहमदनगर,मा.मंगला राजपूत,धुळे,माधुरी खडके,औरंगाबाद, निर्मला जिवने, नागपूर, ललिता जाधव, पिंपळनेर,मा.सौ.सुरेखा कलबुर्गे, औरंगाबाद,मा.ग्लोरिया डिसोजा, मुंबई,मा.रेखा पाटील,धुळे,मा. माधुरी देवरे,नाशिक,मा.सपना चव्हाण, सोलापूर,मा.संगीता दाभाडे, औरंगाबाद, गितांजली वाघ, पालघर, राधिका देशपांडे, बुलढाणा,मा.पुजा डोमाळे, औरंगाबाद,मा.सुवर्णा तावरे, सांगली,संघमित्रा पवार, मुंबई, संगीता ढोले, वाशिम, सौ.पुष्पा किसनराव पवार, औरंगाबाद, संगीता रामटेके, गडचिरोली इत्यादी महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच महात्मा फुले जीवन गौरव सन्मान सोहळ्यात डॉ.पी.एन.पठारे,(नालेगाव) औरंगाबाद, जी.बी.जगताप,(नालेगाव) औरंगाबाद, कवयित्री कल्पना घुगे, जालना, नंदकिशोर मसुरकर, मुंबई, मंजू वानखडे, अमरावती, प्रा. डॉ. कुऱ्हाडे, कोल्हापूर, नानासाहेब दानवे, औरंगाबाद, इत्यादी मान्यवरांना सन्मानपत्र, मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, ग्रंथ, गुलाबपुष्प देऊन सन्मापुर्वक गौरविण्यात आले.या कार्यक्रमाला सर्वच मान्यवरांना करिता उत्तम जेवन,चहा,पाणी इत्यादी व्यवस्था विशेष करण्यात आली होती.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप दा. त्रिभुवन यांनी केले तर आभार सौ.रमा त्रिभुवन यांनी मानले तर सुत्रसंचालन कु.माधुरी खडके, औरंगाबाद यांनी केले.