कन्हेरवाडी – देव्हाडा बायपास सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन श्रीरामजी मुंडे यांच्या हस्ते संपन्न

32

🔸श्रीरामजी मुंडे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून सिमेंट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.27मार्च):-मा.पंकजाताई व खा.डाॅ.प्रितमताई यांच्या सुचनेनुसार कन्हेरवाडी गावचे सरपंच राजेभाऊ फड यांचा प्रयत्नातुन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माननीय महादेवजी जानकर साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून दहा लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या कामाचा मा. श्रीरामजी मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

*कन्हेरवाडी – देव्हाडा बायपास सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन मा.श्रीराम मुंडे यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

*कन्हेरवाडी – देव्हाडा येथील रहिवाश्यांच्या रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे, येणाऱ्या काळात मा.पंकजाताई व खा.डाॅ.प्रितमताई यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक प्रश्न मार्गी लावु असे प्रतिपादन श्रीरामजी मुंडे यांनी भूमिपूजन प्रसंगी केले.

मा.श्रीरामजी मुंडे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून सिमेंट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ रस्ता भूमिपूजन कार्यक्रमास मा.श्रीरामजी मुंडे, उपसरपंच रामहरी फड, माजी पंचायत समिती सदस्य भास्कर नाना रोडे, किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मिनीनाथ दादा फड, मधुकर मुंडे, रवि रोडे,भाजपचे युवा नेते सतीश भाऊ फड, ग्रामपंचायत सदस्य विकास मुंडे, प्रल्हाद गित्ते, अमोल रोडे , महादेव मामा मुंडे, विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मुंडे, भाजपचे युवा नेते, मुंजा फड, युवा नेते प्रशांत रोडे, उपस्थित होते