पोषण आहार वाटपाच्या आदेशामुळे शाळांची गोची

85

🔹शाळांना आले स्वस्त धान्य दुकानांचे स्वरूप

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.मार्च):-विद्यार्थ्यांना पोषण आहाराऐवजी रोख पैसे देणार म्हणून तातडीने बँक खात्यावर जमा होणार म्हणून बँक खाती काढली .परंतु ,शासनाने आपल्याच आदेशास वाटण्याच्या अक्षता लावत अचानक मागील सहासात महिन्यांचे धान्य शाळांना पाठवून त्याचे त्वरित वाटप करावे असे आदेश दिल्याने शाळासमोर यक्षप्रश्न निर्माण झाला आहे .धान्य जादा असल्याने धान्य नेताना पालक व विद्यार्थ्यांची तसेच शाळांची दमछाक होत आहे .त्यामुळे शाळांची अवस्था स्वस्त धान्य दुकानासारखी झाली आहे .

शासन पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देते ,तो शिजवून दिला जात होता .कोरोनामुळे सातआठ महिन्यापासून आहार शिजवणे बंद झाले होते .त्या पार्श्वभूमीवर पोषण आहाराऐवजी रोख पैसे देण्यामुळे बँक खाते काढण्याचे आदेश झाले .त्यानुसार विद्यार्थी ,पालक ,शाळा ,बँक कसरत करत बँक खाती काढली .परंतु शासनाने आपलाच आदेश फिरवत आठ दिवसापूर्वी सातआठ महिन्याचे धान्य चक्क शाळांना पाठवून ते वाटप करावे असा आदेश जारी केला .धान्य जादा असल्याने ते उतरायचे कोठे ?मुळात शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यास जागा नाही ,अशा शाळांची अवस्था खूपच वाईट बनली .धान्य व त्याची सुरक्षा असा प्रश्न मुख्याध्यापक ,शाळासमोर आहे .शासन आदेश मानत धान्य वाटप करण्यात येत आहे .जादा धान्य असल्याने भली मोठी ओझी नेताना पालक ,विद्यार्थी वर्गाची दमछाक होत आहे .पोषण आहार पहली ते पाचवी व सहावी ते आठवी अशा दोन प्रकारांत वाटप करतात .त्यात पहली ते पाचवी विद्यार्थ्यांना 15 किलो तांदूळ ,5 किलो हरभरा ,3 किलो मूगडाळ .तर सहावी ते आठवी 23 किलो तांदूळ ,8 किलो हरभरा ,4 किलो मुगडाळ दिली जाते .हे प्रमाण ज्यादा असल्याने शाळा व्यवस्थापनाची कसरत होत आहे .त्यामुळे गेल्या चार पाच दिवसापासून शाळांना स्वस्त धान्य दुकानांचे स्वरूप आले आहे .

*प्रतिक्रिया*

” शासनाने धान्य दिले हे चांगले झाले ,त्याची गरज होती .त्यात सातत्य ठेवावे .परंतु काही दिवसांपूर्वी पोषण आहाराचे पैसे बँक खात्यावर जमा होणार असल्याने त्यासाठी शाळा ,पालक ,बँक यांचा वेळ व पैसा कारणाशिवाय वाया गेला .शासनाची पोषण आहार योजना गरजवंतसाठी चांगली आहे .तो शाळेत चांगल्या पद्धतीने शिजवून घ्यावा .त्यात सातत्य असावे .त्याचे निरीक्षण करणारी यंत्रणा सतर्क असावी .त्यामुळे ही परिणामकारक चालेल त्यात गैरप्रकार होणार नाहीत .