सिरसाळ्याचं महावितरण शेतकऱ्यांच्या मुळावर

41

🔸आठ दिवसांत दोन वेळा ट्रान्स्फर जळाले, दुरुस्तीला दिरंगाई

🔹कर्मचा-यांचा मनमानी आणि अडमूठ कारभार अभियंताही ढिसाळ कारभाराला जबाबदार

✒️अतुल बडे(सीरसाळ प्रतिनिधी)

सिरसाळा(दि.28मार्च):-सिरसाळ्याचं महावितरण शेतकऱ्यांच्या जणू मुळावर उठलं आहे.या ठिकाणी बारा महिणे सुरळीत विज वितरणाची बोंब आहेच आणि आता साधे एक ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीला दिरंगाई केली जात आहे. एकच ट्रान्सफॉर्मर आठ दिवसांत दोन वेळा जळाले आहे. यात शेतक-यांचे खुप मोठे नुकसान होत आहे. चोपडे नामक १०० केव्ही ट्रान्सफॉर्मर गेल्या चार दिवसांपुर्वी जळाले आहे.हेच ट्रान्सफॉर्मर गेल्या आठ दिवसापूर्वीच दुरुस्त करुन आणले होते, आठ दिवसही उलटले नाही तोच दुसर्‍या वेळीही हे ट्रान्सफॉर्मर जळाले आहे. ट्रान्सफॉर्मर ची अशी परिस्थिती अन्य ठिकाणी सुद्धा झाली असल्याचे समजते आहे. या मुळे संबंधित शेतक-यांचा जिव मेटाकुटीला आला आहे.

उन्हाळी/ बागायती पिके पाण्या विना धोक्यात आली आहेत.याला सर्वस्वी संबधित महावितरण जबाबदार आहे. सिरसाळ्यात महावितरण विभागात अंदाधुंदी सुरु आहे तरी पण अतिरिक्त कार्यकारी अभियंता परळी च्या कार्यालयात बसुन बेखबर आहेत. सिरसाळ्यचा प्रभार ज्याच्यां कडे आहे कनिष्ठ अभियंते निंबाळकर तर कधी येतात आणि कधी नाही काही समजत नाही. सदरच्या विभागाचे हे दोन्ही अभियंते/अधिकारी यांच्या दुर्लक्षीत नियोजना मुळे कर्मचारी लाईन मन, टेक्नेशिअन या ठिकाणी ढिसाळ कार्य करत आहेत. याचे परिणाम शेतक-यांना भोगावे लागत आहे. खंडीत विज पुरवठ्या बाबत सामान्य जनता, शेतकरी यांनी कर्मचा-यांना प्रश्न विचारले उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. यांच्या अडमूठी धोरणा मुळे महावितरण विभागा विषयी शेतकरी सामान्य जनतेत असंतोष निर्माण झाला आहे.

● हि ओरड होत आहे : विद्युत ग्राहक/शेतकऱ्यां कडून बिलाचे पैसे घेणे पंरतु त्यांना त्याची पावती न देणे, नवीन ६३ केव्ही, १०० केव्ही साठी ४० ते ५० हजार रूपये अनाधिकृत घेणे. अशा प्रकार होत असल्याची ओरड शेतकरी/सामान्य जनते मधून होत आहे.

● एकही निवासी कर्मचारी नाही
: सिरसाळा महावितरणा अंतर्गत सिरसाळा सह पाच सबस्टेशन आहेत. मोहा,पोहनेर, आचार्य टाकळी,गोवर्धन अशी ती ठिकाणे आहेत. ह्या सबस्टेशन ठिकाणी तर सोडाच सिरसाळ्यातील मुख्य कार्यालयात देखील निवासी कर्मचारी नाहीत. अभियंत्या पासुन ते शेवटच्या टेक्नेशिअन कर्मचा-या पर्यंत सर्वच बाहेर गावाहून ये जा करतात.ड्यूटी संपली ना संपली कि लगेच पळ काढतात, अभियंते महाशय तर उंटावरून शेळ्या राखल्या सारखा कारभार करतात या मुळे सिरसाळ्याची महावितरण वेवस्था ढिसाळ झाली आहे.

● फड,’फड’ करु नका : बिलाच्या रकमेबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या,या बाबत लाईन मन फड यांना विचारणा केली असता फड नामक कर्मचाराने उडवा उडवीची भाषा वापरली.महावितरण च्या विद्युत पुरवठा सेवा देण्यासाठी यास इथे बसवले आहे. उडवा उडवी करण्यासाठी नाही.