सम्यक विध्यार्थी आंदोलन जिवती टीम तालुक्यातील समस्या घेऊन पोहचली जिल्हाधिकारी कार्यालयात !

72

✒️शुद्धोधन बनसोडे(तालुका प्रतिनिधी,जिवती)मो:-7569482081

जीवती(दि.29मार्च):-सम्यक विध्यार्थी आंदोलन जिल्हाअध्यक्ष धीरज भाऊ तेलंग यांच्या नेतृत्वात जिल्हाअधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले .याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष भूषण फुसे साहेबांची प्रमुख उपस्थिती होती .ग्रामीण तालुका म्हणून ओळखला जाणारा जिवती तालुका हा निर्मिती पासून ग्रामीणच राहिला आहे . आजपर्यंत तालुक्यात मूलभूत सुविधांची पूर्तता झाली नाही .

फक्त निवडणुकांपुरतीच तालुक्याची आठवण राजकीय नेत्यांकडून केली जाते .या समस्यां तालुक्यातील लोकांना सांगण्यासाठी सम्यक विध्यार्थी आंदोलन तालुका जिवती तर्फे स्कॉलरशिप बचाव परिषद घेण्यात आली होती .त्याच सर्व समस्या घेऊन सम्यक विध्यार्थी आंदोलनाने जिल्हाअधिकारी कार्यालयाला निवेदन दिले .तालुक्यात टॉवरची निर्मिती करण्यात यावी कारण स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक विध्यार्थ्यानी ऑनलाईन क्लास लावले आहेत .आणि नेटवर्क नसल्यामुळे त्यांना ते बघता येत नाहीत .त्यामुळे त्यांना चंद्रपूर किंवा अन्य शहराच्या ठिकाणी रहावे लागते अनेकांची परिस्थिती बेताची असल्या कारणाने त्यांना राहणं शक्य होत नाही .त्यामुळे तालुक्यात टॉवरची निर्मिती करावी .तसेच तालुक्यातील रुग्णालय हे फक्त टोल नाक्याप्रमाणे झाले आहे .फक्त रुग्णाचा वेळ वाया जातो कोणत्याही सुविधा नाहीत.तालुक्यातील शेतकऱ्यांना पट्टे दिले जात नाहीत .

रस्त्याची दुरावस्था झाली आहे .विध्यार्थ्यानसाठी तालुक्यात वाचनालयांची निर्मिती आतापर्यंत झाली नाही .व तालुक्यात शासकीय वसतिगृह नाहीत त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत .त्यांना शिक्षण पूरक वातावरणच तालुक्यात मिळत नसल्याने गरीब व होतकरू विध्यार्थ्यांच फार नुकसान होत आहे .जातीच्या प्रमाणपत्रावर जाचक अटी लावून विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात आहे .अस्या अनेक समस्या घेऊन सम्यकच्या टीम ने निवेदन सादर केले .यावेळी सम्यकचे नागराज कांबळे ,प्रशिक खांडेकर ,क्षितिज इंगळे ,राजू हरगीले ,आकाश ससाणे ,नम्रता सावंत , ऍड .क्षितिज मेंढे ,प्रणाली जिवने ,निकिता कांबळे ,पूजा कोटनाके ,प्रतीक्षा चौधरी ,प्रदीप गोतावळे , भीमराज बागेसर.इत्यादी सम्यकचे पदाधिकारी व विधार्थी उपस्थित होते .