आ. बांगर यांनी बिनबुडाचे आरोप केलेल्या वक्तव्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध

34

✒️प्रतिनिधी विशेष(हानमंत चंदनकर)मो:-8767514650

शिवसेना सत्ताधारी पक्षाचे आमदार संतोष बांगर यांनी.
वंचितांचे वंचितांचे नेते श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्याने नायगाव वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरातील मुख्य चौकात जाहीर निषेध करण्यात आला.आ.संतोष बांगर यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना भाजपाने एक हजार कोटी दिले असे आमसभेत स्टेजवर बोलताना व्हिडिओ वायरल झाला होता, संतोष बांगर यांनी बेधडकपणे विधान भवनामध्ये एक हजार कोटी घेतले असे आरोप वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब यांच्यावर केले.

खरंच एक हजार कोटी घेतले असते तर पुरावे सादर करा अन्यथा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते.आ संतोष बांगर यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा देत प्रकाश आंबेडकर साहेब यांची माफी मागावी तोपर्यंत बहुजन आघाडीचे कार्यकर्ते शांत बसणार नाही असा इशारा देऊन जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडी तालुकाध्य रामकिशन पालनवार, तालुकाउपाध्यक्ष .भीमराव जोंधळे ,तालुकाउपाध्यक्ष प्रभाकर घंटेवाड, तालुका संघटक बालाजी गायकवाड, बाळासाहेब वाघमारे, नरंगल नगरीचे उपसरपंच .प्रकाश वाघमारे यांनी नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.