सावली केअर सेंटरचा वर्धापन दिन उत्साहात

66

✒️सुरेश राठोड(कोल्हापूर प्रतिनिधी)

कोल्हापूर(दि.31मार्च):-मध्ये करवीर तालुक्यातील पिरवाडी सेंटर येथे सावली केअर सेंटरच्या अठराव्या वर्धापन दिन निमित्त स्नेहसंमेलन चे नियोजन करण्यात आले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘सदृढ भारत योजना’व टाईम बँक या दोन आगामी योजनांबद्दल अध्यक्ष डॉ. किशोर देशपांडे यांनी माहिती दिली.यावेळी उपस्थित रुग्णांचे नातेवाईक, देणगीदार व हितचिंतक या सर्वांच्या उपस्थितीत सावलीची संपूर्ण माहिती, स्थापना, भिकारी मुक्त कोल्हापूर या प्रकल्पाच्या स्थापनेविषयी, पीरवाडी येथील इमारतीच्या बांधकामा वेळेचे किस्से, निधी संकलनवेळेचे अनुभव सांगितले.

यानंतर मधुरा घोरपडे हिने देवीस्तुती वर भारत नाट्यम शैलीमध्ये नृत्य सादर केले, मेडिकल ऑफिसर डॉ. जयश्री कुराडे यांनी सावलीमध्ये कार्यान्वित असलेल्या विभागाची माहिती दिली. मातूल, सावलबन शिबिर, द ब्रिज, बॉडी अरगोनॉमिक्स, प्री प्रायमरी टीचर वर्कशॉप प्रकल्पाबाबत चर्चा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ शेवाळे यांनी केले. या कार्यक्रमाला 350 पेक्षा अधिक लोकांची उपस्थिती होती.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटिल सहपत्नी हजर होते.यावेळी कार्यक्रमाला मकरंद देशमुख, बाबुराव चौगुले, सुरेश खांडेकर,सुषमा शितोळे, विनोद दिग्रजकर, डॉ. प्रकाश काळे, सुभाष नीयोगी, घनश्याम पटेल, कमल हर्डीकर, अनिल वेल्हाळ, विनायक गोखले, मिलिंद ओक, प्रकाश पाटील, रविदर्शन कुलकर्णी व सावली चे सर्व कर्मचारी आदी उपस्थित होते.