धरणगाव येथे आज स्वस्त धान्य दुकानदारांनी ई – पॉस मशीन केले तहसील कार्यालायात जमा

29

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.2एप्रिल):- ई पॉस मशीनवर धान्य वितरणामध्ये येत असलेल्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता व 31 मार्चपर्यंत समस्या सोडवण्यात न आल्याने शुक्रवार , 1 एप्रिल रोजी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे वतीने तहसीलदारांकडे इ पॉस मशीन जमा करण्यात आल्या.यावेळी राजेंद्र ओस्तवाल यांनी तहसीलदारांकडे ई पॉस मशीन संदर्भात येत असलेल्या अडचणींचा पाढा वाचून दाखवला. सर्वर डाऊन,नेट न चालणे अशा असंख्य अडचणी येत होत्या.

ई पॉश मशीनमुळे धान्य वितरणामध्ये अनियमितता येत होती.अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाला 31 मार्चपर्यंत अल्टीमेटम संघटनेने दिला होता.अडचणी दूर न झाल्याने 1 रोजी शुक्रवारी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष आर.डी.पाटील यांचे उपस्थितीत जवळपास १०० स्वस्त धान्य दुकानदारांनी आपले ई पॉस मशीन नितीनकुमार देवर धरणगाव तहसीलदार यांचाकडे जमा केल्या यावेळी मोठ्या संख्येने स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते