पत्रकारिता तसेच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कामाची दखल… कोल्हापूरचे सुरेश राठोड मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित

32

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.4एप्रिल):- कोल्हापूर (ता.करवीर) येथील सुरेश किसन राठोड यांच्या पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वंचित घटकांसाठी विविध क्षेत्रातील सामाजिक कार्याची व विविध पुरस्कारांची दखल घेऊन इंडियन एम्पायर युनिव्हर्सिटीच्या युनिव्हर्सल डेव्हलपमेंट कौन्सिल कडून जर्नालिझम आणि सोशल सर्व्हिस या विषयातील मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. शिवाजी युनिव्हर्सिटीचे इतिहास परिषद कार्यकारिणी सदस्य डॉ. धीरज शिंदे यांच्या हस्ते नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.

सुरेश राठोड यांची 2007 पासून गेली 15 वर्ष पत्रकारितेमध्ये ग्रामीण पत्रकार ते संपादकीय पदापर्यंत केलेली वाटचाल अतिशय खडतर व समाज हितासाठी होती. त्यांनी आत्तापर्यंत पाक्षिक, न्यूज पोर्टल, साप्ताहिक, तसेच विविध दैनिकात विशेष लेखन केले आहे. पोलीस न्युज कस्टडी, दक्ष टाइम्स, गंगाधर, पंचनामा, पुरोगामी न्यूज, आर.के.न्यूज, सह्याद्री न्यूज, दैनिक जनमत मध्ये कार्य करत त्यांनी आपल्या लेखणीचा वापर समाजहितासाठी केला. त्याच बरोबर दैनिक लोकमत सखी मंच प्रतिनिधी म्हणून अनेक वर्ष महिलांचे संघटन त्यांनी केले आहे.

राठोड यांना अनेक संस्था, फौंडेशन व पोलीस डिपार्टमेंटने आदर्श पत्रकार व समाजसेवक या पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांच्या डॉक्टरेट पदवीची बातमी कळताच त्यांना डी.वाय.एस.पी. पी आर पाटील, डॉ. सुमित्रा भोसले पाटील, डॉ. सुशीला अग्रवाल, सुरेश माडकर, सरदार पाटील, सुभेदार आर.एस.पाटील, हवलदार जांभिलकर, शशिकांत कांबळे, पत्रकार निलेश जाधव, स्थानिक ग्रामस्थ यासह मित्रमंडळींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उत्तम जन संपर्कामुळे श्रीलंका तसेच दुबई येथून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.