युनियन बँक तुमसर ने दहा रुपयांची नाणी नाकारली – भारतीय मुद्रेची केली अवमानना-Union Bank of India

32

🔹जवाबदार अधिकाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

तुमसर(दि.6एप्रिल):–युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) शाखा तुमसर भारतीय चलन असलेले दहा व पाच रुपयांचे नाणे स्वीकारत नसल्याने R R SALES कापड दुकान मालकाने जिल्हाधिकारी भंडारा तसेंच आरबीआय कडे तक्रार करून युनियन बँक ऑफ इंडिया तुमसर शाखेच्या जवाबदार अधिकाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी केली आहे. सविस्तर असे की युनियन बँक शाखा तुमसर येथे खाता असल्याने खाताधारक रोहित बोंबार्डे दररोज प्रमाणे दिनांक ५ एप्रिल दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान १० चे नाने रु १००० व ५ चे नाने रुपये ५०० रुपये असे १५०० रुपये खात्यात पैसे भरण्यास गेले असता बँकेतील अधिकाऱ्याने पैसे स्वीकारण्यास नकार दिला.

मी त्यांना पैसे नं स्वीकारण्याचे कारण लिहून द्या असे बोललो असता कोणतीही कारण लिहून दिले नाही त्याची वरिष्ठ यांना तक्रार केली असता आमच्याकडे भरपूर स्टॉक असल्याचे त्यांनी सांगितले.अश्याप्रकारे भारतीय मुद्रेची अवमानना केली आहे कार्यवाही करण्याची मागणी कापड मालक रोहित बोंबार्डे यांनी जिल्हाधिकारी भंडारा व आर बी आय प्रबधकाकडे केली आहे.

———————

भारतीय चलन नाकारणे हा देशद्रोहाचा गुन्हा

भारतीय चलन नाकारणे हा देशद्रोहाचा गुन्हा आहे. या बाबतीत जिल्हाधिकारी हे सक्षम प्राधिकारी असून, त्यांनी सर्व सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांना त्वरित आदेश देऊन दहा पाच रुपयांची नाणी स्वीकारण्याचे आदेश द्यावेत.तसेच भारतीय चलन नाकारणाऱ्या युनियन बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. याविषयी भारतीय रिझर्व बँकेच्या राज्य प्रबंधकांना पाठपुरावा केला जाईल.

रोहित बोंबार्डे
आर आर सेल्स कापड दुकान मालक तुमसर