निमगाव खंडोबा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा पुर्व तयारी मेळावा संपन्न

42

✒️मनोहर गोरगल्ले खेड(राजगुरुनगर,विशेष प्रतिनिधी)

राजगुरू नगर(दि.7एप्रिल):- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव येथे शाळा पूर्वतयारी मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मेळाव्यात निमगाव शाळा देऊळवाडा शाळा ,माणिकनगर शाळाया तीनही शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी नटून-थटून मेळाव्याचा मनमुराद आनंद घेतला .दाखल पात्र विद्यार्थ्यांची. सजवलेल्या ट्रॅक्टर मधून . ढोल ,ताशा लेझीम च्या गजरात संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. शाळेत आल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सर्व दाखल पात्र विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर फित कापून मेळाव्याचे उद्घाटन झाले .नंतर सरस्वती पूजन झाले .शाळेत सर्व उपक्रमांचे टेबल लावले होते.

प्रत्येक टेबलवर जाऊन विद्यार्थ्यांनी आपल्या कृती पूर्ण केल्या नंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले . मेळाव्यासाठी पिंपरी केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ .खोडदे मॅडम उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले.तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपक राव शिंदे ,उपाध्यक्ष योगिताताई शिंदे ,सर्व सदस्य, तसेच गावचे आजी-माजी सरपंच ,उपसरपंच आणि सर्व सदस्य उपस्थित होते.विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष, उपअध्यक्ष व सर्व सदस्य आणि महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, तसेच पत्रकार मनोहर गोरगल्ले कार्यक्रमाला उपस्थित होते. ग्रामसेवक आणि गावचे ग्रामस्थ अशा सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. .शाळापूर्व तयारी मेळाव्यासाठी गावातील सर्व अंगणवाडी ताईंचे फार मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे नियोजन निमगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री जालिंदर दिघे सर, नप्ते सर, कान्हूरकर सर, कोल्हे मॅडम व कातोरे मॅडम, तसेच माणिक नगर शाळेच्या शाळा प्रमुख दौंडकर मॅडम ,आदक मॅड बंडम आणि देऊळवाडा शाळेचे शाळा प्रमुख डुबे सर यांनी केले .