उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक आरोग्य दिवसाचा कार्यक्रम उत्साहात साजरा

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

वरोरा(दि.9एप्रिल):-7 एप्रिल 2022 रोजी उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक आरोग्य दिवसाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. डाॅ . प्रफुल्ल खूजे जनरल सर्जन , सौ. वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा सौ. कोडापै ,सौ. कुमरे , राजपूत सर ईसीजी टेक्नीशियन या सर्वांनी दिपप्रज्वलन करून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता दैवत यांची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी आपल्या प्रास्ताविकात संपूर्ण आरोग्य कसे ठेवायचे याच्या बद्दल मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन सौ. रबिना खान व आभारप्रदर्शन सौ वर्षा भूसे यांनी केले.

जवादे सर, सौ. भुसे , यांनी आरोग्य विषयावर आपले मत मांडले. सोबत रांगोळी स्पर्धा , स्लोगन स्पर्धा आयोजित केली होती,भरपुर प्रतीसाद मिळाला. या मार्फत जनजागृती करण्यात आली रांगोळी स्पर्धा मध्ये आॅपरेशन थेटर मधून सौ रूबिना खान , अंकिता लोखंडे,शितल राठोड ,आयपिडि डिपार्टमेंट मधून सौ. वैशाली,सौ मीना मोगरे, विषयी सविस्तर माहिती दिली. डाॅ खूजे यांनी अध्यक्षीय भाषणात बदलती जीवनशैली आणि आरोग्य विषयावर मार्गदर्शन केले.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे प्रेरक मानून पूजन करून ईतनी शक्ति हमे देना दाता या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.