डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव अध्यक्षपदी विशाल गायकवाड यांची निवड…

25

✒️प्रतिनिधी नायगाव(हानमंत चंदनकर)मो:;8767514659

नायगाव(दि .9एप्रिल):-भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या सार्वजनिक जयंती महोत्सवा निमित्ताने शिरूर अनंतपाळ येथे बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत जयंती महोत्सवात भीम गीताचा, ग्रामीण रूग्णालय येथे रूग्णाना फळे वाटप, रक्तदान शिबीर, लहान मुलांसाठी संगीत खुर्ची,व्याखान,भव्य शोभायात्रा तसेच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत तसेच या बैठकीत डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची खालील प्रमाणे निवड करण्यात आली.

या मध्ये अध्यक्ष पदी विशाल गायकवाड, उपाध्यक्ष राहुल कांबळे, सचिव गणेश कांबळे, सहसचिव हुसेन मांदळे, कोषाध्यक्ष गर्जन गायकवाड, कार्याध्यक्ष चैतन मांदळे,सहकोषाध्यक्ष अविनाश जाधव, कार्याध्यक्ष प्रदिप बानाटे, प्रसिध्दी प्रमुख तुषार मांदळे, मिरवणूक प्रमुख योगेश मांदळे, सिध्दार्थ गायकवाड,विशाल गिलचे व अनेक सदस्य निवडण्यात आले या वेळी उत्तम गायकवाड, डॉ उध्दव गायकवाड,रघुनाथ गिलचे, मुकेश गायकवाड, सुधिर गायकवाड, नितीन मांदळे,सयाजी गायकवाड, आदी उपस्थित होते…