घाणेरड्या राजकारणामुळे सुशिक्षित बेरोजगारांचे जीव धोक्यात

28

🔸’नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न’ या मनी प्रमाणे पेपर फुटी प्रमाण जास्त

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.9एप्रिल):- भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो परंतू आज तो तरुण बेरोजगारांचा देश झाला आहे. भारतातील बहुतांश लोकसंख्या खेळ्यात राहते. आधुनिकरणाच्या प्रक्रियेमुळे स्पर्धा परीक्षेचे लोण खेड्यांपर्यंत पोहोचले आहे . आपणही नोकरीवर लागून आपली परिस्थिती सुधारावी अशी आशा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे . त्यासाठी ते तन – मन – धनाने अभ्यास करत आहेत . त्यांचे पालकही त्यांना सर्वोतोपरी मदत करत असतात.परंतु सरकारच्या उदासनतेमुळे वर्षानुवर्षे पेपरच होत नाही . झालेच तर ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न’ या मनी प्रमाणे पेपर फुटणे, निकाल न लागणे यासारखी कोणतीतरी बाधा आलीच म्हणुन समजा.या सर्व कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. काहींनी तर आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊलही उचलले आहे.

ही परिस्थिती बदलण्यासाठी तथाकथित राजकारण्यांनी फक्त मतांचे गणित न पाहता युवकांच्या आयुष्याचे गणित पहावे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांत निर्माण झालेला स्पर्धा परीक्षा विषयीचा विश्वास तोडून त्यांना मूळ प्रवाहात येण्याची संधी नाकारू नका.जिद्द,चिकाटीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राख – रांगोळी करू नका.द्या त्यांनाही संधी स्वतःला आजमावण्याची.उभारतील तेही उंच पताका यशाची. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी व्यक्तीकडे रोजगार असणे आवश्यक आहे . त्यासाठी सरकारने जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध कराव्या हीच रास्त अपेक्षा.