एकनिष्ठा गौ-सेवा रुग्णसेवा फाऊंडेशन कार्याचा सामाजिक सत्कार

56

✒️खामगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

खामगाव(दि.14एप्रिल):-खामगांव:- नांदुरा येथील मोहनराव नारायणा नेत्रालय मोठा हनुमान स्थित येथे संपूर्ण विदर्भातून सर्व सुविधांनी सुसज्ज अश्या नेत्रालयाचा लोकार्पण सोहळा दिनांक १० रोजी आयोजीत करण्यात आला होता.

या कार्यक्रमात एकनिष्ठा गौ-सेवा रक्तसेवा रुग्णसेवा फाऊंडेशन खामगांवच्या कार्याची दखल घेऊन संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव, उपसचिव राम अवचार, जिल्हाध्यक्ष शेखर रिछारीया, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सिद्धेश्वर निर्मळ यांचा सत्कार सन्मानपत्र देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख आमदार मा. राजेशजी एकडे, डॉ विठ्ठलराव दांडगे, महेंद्र पाटील, घनश्याम राठी, लॉ नरेंद्र भंडारी, डॉ हार्दिक पटेल, लॉ निलेश चौधरी, डॉ शैलेश छाजेड, लॉ अभय शास्त्री, डॉ विजय पाटील आदि मान्यवरांच्या उपस्थितीत एकनिष्ठा फाऊंडेशनच्या पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. अशी माहिती अजय ताठे यांनी दिली.