आता एकाच वेळी घेता येतील दोन पदव्या

98

✒️नागेश खुपसे-पाटील(सोलापूर जिल्हा प्रतिनिधी)

सोलापूर(दि.14एप्रिल):-विद्यापीठ अनुदान आयोगाने एकाचवेळी दोन पदव्या घेण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली आहे – आयोगाचे अध्यक्ष डॉ. एम. जगदेशकुमार यांनी याबाबतची घोषणा केली.

पदव्या कश्या घेता येतील ?

यानिर्णयामुळे विद्यार्थी एका विद्यापीठातून बीए करताना , दुसऱ्या विद्यापीठातून बी. कॉम़ करू शकतील – म्हणजेच दोन वेगवेगळय़ा विद्याशाखांतील अभ्यासक्रमांचे शिक्षण एकाचवेळी घेता येईल
आयोगाने दिलेल्या माहिती प्रमाणे दोन्ही अभ्यासक्रम शिक्षण संस्थांमध्ये प्रत्यक्ष प्रवेश घेऊन करता येतील – यामध्ये एक अभ्यासक्रम प्रत्यक्ष आणि एक ऑनलाइन किंवा दोन्ही ऑनलाइन पद्धतीने करता येतील.

तसेच दोन विद्यापीठे करार करून अभ्यासक्रम, तसेच परीक्षा यांच्या वेळांबाबत समन्वय साधूनही विद्यार्थ्यांसाठी पर्याय उपलब्ध करून देऊ शकतील.या दरम्यान प्रवेशाचे नियम, हजेरीचे नियम, वेळापत्रक हे ठरवण्याचे अधिकार विद्यापीठांना असतील असेहि डॉ. जगदेशकुमार यांनी सांगितले.