रेशन दुकानातील तब्बल तीन टन गव्हाची बेकायदेशीर व अवैध साठवणूक!

95

✒️मनोहर गोरगल्ले(राजगुरुनगर(पुणे)विशेष प्रतिनिधी)मो:-97672 14634

इंदापूर तालुक्यातील रेशन दुकानातील तब्बल तीन टन गव्हाची बेकायदेशीर व अवैध साठवणूक करून अपहार करत असताना इंदापूर पोलिसांनी महसूल खात्याने व अन्न पुरवठा विभागाने संयुक्त कारवाई करत या दुकानदारावर कारवाई केली. कारवाईचे स्वागतच आहे; प्रश्न आहे तो हा की, अशा प्रकारची अपहाराची सवय सुटणार कधी?इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूरचे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांनी महसूल व पोलिस प्रशासनाच्या केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल 65 पिशव्या आणि तीन टन शंभर किलो गहू पोलिसांनी या कारवाईत पकडला. पुरवठा निरीक्षक संतोष निशीकांत अनगरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मयुर अशोक चिखले (वय ३२ वर्षे), अतुल सोमनाथ होनराव (वय ४९ वर्षे) व वत्सला भानुदास शिंदे या तिघा विरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.

या गव्हाची शासनमान्य किंमत 62 हजार रुपये असून या गव्हासह महिंद्रा कंपनी चा ४ लाख रूपये किंमतीचा पिकअप (क्रमांक : एम. एच. ४२ एम ७०३३) पोलिसांनी ताब्यात घेतला. यासंदर्भात पुरवठा निरीक्षक संतोष अनगरे यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.वरील सर्व वर्णन असलेला शासन मान्य रेशन दुकानातील गहू या जीवनावश्यक धान्याची बेकायदेशीर व अवैधरित्या साठा करून अपहार केल्याप्रकरणी १) मयूर अशोक चिखले (वय ३२),२) अतुल सोमनाथ होनराव (वय ४९), वत्सला भानुदास शिंदे यांच्याविरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा कलम १९५५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणाची फिर्याद संतोष निशिकांत अनगरे (वय ४६) पुरवठा निरीक्षक तहसील कार्यालय इंदापूर यांनी दिली आहे. सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, उपविभागीय पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामती विभागीय पोलिस अधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर, पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे, पोलीस कॉन्स्टेबल काळे, पोलीस कॉन्स्टेबल फडणीस यांनी केली.