घुग्घुस शहरात मोठी दुर्घटना होता,होता वाचली

31

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.16एप्रिल):-मोठी दुर्घटना होता होता वाचली
घुग्घुस इथे बोंबले पेट्रोल पंप समोर वणी रोड लगत एका खंडर घराला लागली आग खंडर अवस्थेत पडून असलेल मकानात काही दिवसापासून एक पागल इसम राहत आहेत अचानक दिनांक16 एप्रिल रोजी ११वाजता दुपारच्या दरम्यान आग लागल्याचे चित्र दिसून आले आणि ते दिसताच काही लोकांनी आगीला विझविण्याचा प्रयत्न सुध्दा केला काही प्रमाणत आग विझवण्यात आली. त्या नंतर घुग्घुस नगर परिषदेच्या अग्निशामक काही लोकांनी फोन करुन बोलवण्यात आले.

ह्या इसमाने या आधीही आग लावली असल्याचे बोलले जात आहेत पण या आधी आग छोट्या प्रमाणत होती.त्या पिसाळलेल्या युवकांमुळे मोठी जीवित हानी झाली असती त्याचा बंदोबस्त झाला पाहिजेत असे घुग्घुस वासियाकडून मागणी होवू लागली आहेत
मात्र घुग्गुस इथे अश्या पागल इसमाचे प्रमाण जास्त वाढले असून प्रशासनाचे मात्र या कडे लक्ष दिसून आले नाही.मात्र मोठी दुर्घटना झाल्यावर लक्ष राहणार की काय हे महत्वाचे?