डिवायडरवर स्कॉर्पिओ धडकली, साक्षाळपिंप्रीचे शिवसेना कार्यकर्ते दत्ता काशिद यांचे निधन

112

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.18एप्रिल):-औरंगाबादहून बीडकडे येत असताना शिवसेनेचे कार्यकर्ते दत्ता काशिद यांची स्कॉर्पिओ तलवाडा फाट्याजवळील बागपिंपळगाव या ठिकाणी डिवायडरवर धडकल्याने या अपघातात काशिद गंभीररित्या जखमी होऊन मरण पावले तर अन्य दोघे जण यात जखमी झाले.या दुर्दैवी घटनेने साक्षाळपिंप्री येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. बीड तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथील शिवसेनेचे कार्यकर्ते दत्ता काशिद हे आपली स्कॉर्पिओ क्रमांक एम.एच. 23 एएस 8229 यामध्ये औरंगाबादला गेले होते.

ते रात्री औरंगाबादहून बीडकडे परत येत होते. तलवाडा फाट्याजवळील बागपिंपळगाव येथे त्यांची स्कॉर्पिओ डिवायडरला धडकली. यात दत्ता काशिद हे गंभीररित्या जखमी होऊन मरण पावले तर अन्य दोघे जण जखमी झाले.काशिद हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून परिचीत होते. त्यांच्या या निधनाने साक्षाळपिंप्रीसह आदी परिसरात हळहळ व्यक्त केलीज जात आहे. आज सकाळी त्यांच्या पार्थीवदेहावर साक्षाळपिंप्री येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.