संघानी आणि बौद्धधम्म प्रचारकांनी नवायनाचा प्रचार करावा-अप्पाराव मैन्द

111

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.18एप्रिल):-बौद्ध धम्मात कालस्थलसापेक्ष १८ पंथ निर्माण झाले.डाॕ,बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाज व्यवस्था निर्मित दुःख निवारण करण्यास बौद्धधम्म उपयोगी पडू शकेल काय ? असा प्रश्न उपस्थित करून, त्यांनीच त्याचे उत्तर होकारार्थी दिले ;तथापि पारंपारिक बौद्ध साहित्य भरपूर विसंगतीने भरलेले आहे, ते जे बौद्ध नाहीत त्याना स्वीकाहार्य होणार नाही.म्हणून बौद्धधमांतील विसंगती सारून डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धधम्माची मांडणी करून भारतीयांना नवीन स्वरूपात बौद्धधम्म दिला आहे. त्यालाच नवायन किंवा भिमायन म्हणतात.नवायन बौद्धधम्म भारतीयांचे सामाजिक दुःख दूर करू शकेल असे डाॕ.बाबासाहेब आंबेडकराची धारणा आहे.म्हणून बौद्ध भिक्षु संघानी आणि बौद्धधम्म प्रचारकांनी नवायन बौद्धधम्माचाच प्रचार करावा असे प्रतिपादन चार्वाकवनाचे व्यवस्थापक अॕड.अप्पाराव मैंद यांनी भारतरत्न डाॕ,बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात बोलताना केले.

पुसद शहरात मोठ्याप्रमाणात डाॕ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव होतो आणि त्या कार्यक्रमात कार्यकर्ते व्यस्त राहत असल्यामुळे चार्वाकवनात आतापर्यंत भीम जयंतीचे आयोजन करण्यात येत नव्हते;परंतु चार्वाकवन व्यवस्थापनाने या वर्षीपासून भीम जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानूसार दि.१४ एप्रिल २०२२ रोजी भीम जयंती कार्यक्रमाचे आयोजन चार्वाकवनात सकाळी १० वाजता करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.टी.बी.कानिंदे होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन आयु.यशवंत देशमुख यांनी केले .प्रास्तविक आयु.गोवर्धन मोहिते य, आभार अॕड. अप्पाराव मैन्द यांनी मानले .कार्यक्रमास सर्व आयुमान मा.ल. धुळध्वज तायरखाँ पठाण,भीमराव कांबळे,नारायणराव क्षिरसागर,पंजाबराव सुरोशे,तातेराव मानकर,भीमराव भवरे ,रामधनी सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमात आयु.पंजाबराव सुरोशे,आयु.मा.ल.धुळध्वज ,नारायणराव क्षिरसागर ,तातेराव मानकर यांची समयोचित भाषणे झालीत.भीम जयंती कार्यक्रमाचे औचित्य साधून यावर्षी धम्मभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या आयु.भीमरावदादा कांबळे यांचा सत्कार चार्वाकवनातर्फे अॕड अप्पाराव मैन्द यांनी केला.सत्काराचा सविनय स्वीकार करून धम्मभूषण भीमराव दादा यांनी सत्कारास उत्तर देतांना चार्वाकवनातर्फे चालू असलेल्या धम्म प्रचार कार्याची प्रशंसा केली.याच कार्यक्रमात आयु.संजय आसोले लिखित ‘ आपले आरोग्य आपल्या हाती .’ या पुस्तकाचे प्रकाशन पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमास बाहेर गावावरून आलेली आणि पुसद शहरातील जवळपास १२०ते १२५ स्री-पुरुष उपस्थित होते.चार्वाकवनातर्फे सर्वाची नास्ता,चाय आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. ०००