कोलाम परिषद : मानचिन्हाचे प्रकाशन

33

🔹आदिम समुदायाच्या प्रश्नांवर चर्चा करणारे प्रभावी व्यासपीठ : प्रा. डाॅ. राजेन्द्र मुद्दमवार

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(ता.2६एप्रिल):-चंद्रपूर जिल्ह्यातील आदिम कोलाम समुदायांचे प्रश्न अतिशय गंभीर स्वरूपाचे असून, ते प्रश्न शिघ्रतेने सोडविले जावेत यासाठी शासनाने गांभिर्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोलामांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी कोलाम परिषदेच्या व्यासपीठावर व्यापक चर्चा घडून येईल असा आशावाद प्रा. डाॅ. राजेन्द्र मुद्दमवार यांनी व्यक्त केला.

कोलाम विकास फाऊंडेशन व अन्य सोळा संस्थांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या तिस-या कोलाम परिषदेच्या मानचिन्हाचे प्रकाशन प्रा. डाॅ. मुद्दमवार यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय मोरे, कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे, नेफडोचे अध्यक्ष बादल बेले, स्वरप्रितीचे अध्यक्ष दिलीपराव सदावर्ते, जेसिआयचे झोन अधिकारी सुषमा शुक्ला, पाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अँड. दिपक चटप, मराठा सेवा संघाचे विजय मोरे, आपुलकी फाऊंडेशनचे कृतिका सोनटक्के, तनिष्का व्यासपीठचे सुनिता कुंभारे, प्रणाली टाकसांडे, जयश्री शेंडे, इनरव्हिलचे स्वरूपा झंवर, अंजली गुंडावार, राजश्री देशपांडे, चित्रलेखा धंदरे, लटारू मत्ते, स्वतंत्र शुक्ला व अन्य सभासद उपस्थित होते.