घुग्घुस नगर परिषदतर्फे दिव्यांग बांधवांना अनुदान वाटप

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.30एप्रिल):- नगर परिषदेच्या स्वउत्पनातील वार्षिक पाच टक्के दिव्यांग व्यक्तिसाठी निधी खर्च करावयाचे असतात.या अनुषंगाने घुग्घुस नगर परिषद लाभ घेण्याकरिता जाहीर सुचना व वृत्तपत्र द्वारे दिव्यांग बांधवाना नगर परिषद कार्यालयात अर्ज मागवण्यात आले होते.

त्यानुसार घुग्घुस शहरातील एकूण १३० लाभार्थ्यांनी नगर परिषद कार्यालयात अर्ज सादर करण्यात आले.व या अर्जानुसार सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षांतील अर्थ संकल्प तरतूदीमधील महसुली उत्पन्नातुन ५% निधी अपंग कल्याण निधी राखीव ठेवण्यात आला असून या निधीतून १२५ दिव्यांग बांधवाना त्यांचा बँका खात्यात एकूण चार लाख दहा हजार (४,१०,०००) इतका अनुदान जमा केल्याचे घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्यधिकारी यांनी बोलले जात आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED