मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी बालासाहेब खानजोडे ,उपाध्यक्ष सोनमनकर तर सचिव म्हणून राम मोहिते यांची निवड..

✒️सिध्दार्थ वाठोरे(हदगाव-नांदेड प्रतिनिधी)

हदगाव(दि.7मे):- तालुक्यांतील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी तामसा येथील पत्रकार भवन या ठिकाणी घेण्यात आलेल्या बैठकीत तामसा येथील पत्रकार बालासाहेब खानजोडे यांची बिनविरोध मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी नंदकिशोर सोनमनकर यांची निवड करण्यात आली.तामसा येथील पत्रकार भवन या ठिकाणी घेण्यात आलेल्या पत्रकार संघाच्या बैठकीचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार रंगराव कांबळे हे होते .या ठिकाणी पत्रकार संघाच्या बैठकीच्या ठिकाणी विविध विषय घेण्यात आले या वेळी मराठी पत्रकार संघाची कार्यकारणी जाहिर करण्यात आली.

या वेळी मराठी पत्रकार संघाच्या सचिव पदी राम मोहिते,कोषाध्यक्ष शेख मतलूब भाई,सहसचिव संतोष डवरे,संघटक शिवाजी मात्रे,भगवान शेळके, सल्लागार रंगराव कांबळे,मार्गदर्शक सदस्य म्हणून गौतम कदम पत्रकार,देविदास वाघमारे,देविदास स्वामी,शेख महमूद,पत्रकार,बालासाहेब वाघमारे, सिद्धार्थ वाठोरे, अंकुश मिराशे,शिवाजी सूर्यवंशी, प्रशांत खंदारे यांची निवड करण्यात आली याच बरोबर पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी बालासाहेब खानजोडे यांची निवड झाल्याने कौतुक व अभिनंदन नुतन पत्रकार कार्यकारणी चे करण्यात आले या वेळी हदगाव- हिमायतनगर मतदार संघाचे विद्यमान आमदार माधवराव पाटिल जवळगावकर,माजी आ.नागेश पाटिल आष्टिकर ,रमेश पाटिल घंटलवार यांनी अभिनंदन केले आहे.

“ग्रामीण भागातील पत्रकारावर खोटे गुन्हे,खोट्या तक्रारी ,पत्रकार वर्गावर होणाऱ्या अन्यासाठी आपण सदैव पत्रकार वर्गाच्या पाठीशी राहणार “- बालासाहेब खानजोडे , नूतन अध्यक्ष मराठी पत्रकार संघ तामसा

“सर्व पत्रकार बांधवांना सोबत घेऊन परिसरातील नागरीकांना आपल्या बुलंद लेखणीतून न्याय मिळवण्यासाठी आम्ही मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रयत्न करणार आहोत..”- राम मोहिते,नूतन सचिव मराठी पत्रकार संघ तामसा..

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED