एक दिवसीय विपश्यना साधना शिबिराचे आयोजन

✒️वर्धा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

वर्धा(दि.10मे):-हावरे ले आऊट सेवाग्राम येथील महाकोशल बुद्ध विहारामध्ये जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त रविवारला एक दिवसीय विपश्यना साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरासाठी मनोज सोनवाणे (वर्धा जिल्हा समन्वयक मैत्री उपक्रम ) तसेच आयु. पंढरी ताकसांडे, धम्ममैत्री यांचे विषेश सहकार्य लाभले.सदर शिबीरामध्ये आनंदी गाव उपक्रम, मैत्री उपक्रम यांची माहिती मनोज सौनवणे यांनी दिली.

त्याचप्रमाणे आणापान साधनेचा सराव घेतला. मंगलमैत्री करवून घेतली. सदर शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांनी सहभाग घेतला. शिबिराचे आयोजन गौरव बेले यांनी केले होते. शिबिराच्या यशस्वितेसाठी तुळशीराम मुंजेवार, रजनीश फुलझेले, मारोतराव गोटे , चरणदास नाईक, विनोद वानखेडे, विशाल इंगोले (अजातशत्रू) , त्याचप्रमाणे वृंदाताई बेले, निर्मला चाटे, अनिता गोटे,शोभा शंभरकर, शारदा कांबळे, नगराळे, जिवतोडे, नाईक,वंदना मुंजेवार, प्रशिका शंभरकर, रत्नमाला कांबळे यांनी सहकार्य केले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सांगली, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED