अ. भा. अंनिसद्वारे आयोजित व्यक्तिमत्त्व विकास शिबिर संपन्न

29

✒️पियुष रेवतकर(कारंजा घाडगे प्रतिनिधी)

कारंजा(घा)(दि.22मे):-कारंजा येथे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कारंजा (घा) जि-वर्धा व अक्षर मानव वर्धा आणि नारायणराव काळे स्मृती मॉडेल कॉलेज कारंजा (घा)जि -वर्धा द्वारा व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.दिनांक 22 मे 2022 दिवस रविवार ला सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत या शिबिराचे आयोजन नारायणराव काळे स्मृती मॉडेल कॉलेज कारंजा (घा) येथे करण्यात आले होते.

आपण कसे घडतो ,संवाद कौशल्य, अभ्यासाचे तंत्र,वैज्ञानिक दृष्टीकोन, व्यक्तिमत्त्व घडवणार ब्रेन प्रोग्रामिंग, आत्मविश्वास, सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टिकोन ,मोबाईलचा अतिरिक्त वापराचे धोके आणि उपाय यासह विविध विषयावर मा. पंकज वंजारे प्रसिद्ध वक्ते तथा महाराष्ट्र राज्य युवा शाखा संघटक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती यांचे मार्गदर्शन शिबिरार्थींना लाभले.या कार्यक्रमाचे उदघाटक डॉ .मेघा कळंबे संचालिका कळंबे हॉस्पिटल कारंजा व डॉ.प्रा .उमेश मेश्राम कार्याध्यक्ष अ. भा. अ.नि.स तालुका शाखा कारंजा यांच्याहस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.संजय धनवटे नारायणराव काळे स्मृती मॉडेल कॉलेज कारंजा (घा) तथा अध्यक्ष अ. भा. अनिस शाखा कारंजा उपस्थित होते .

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा.सुभाष अंधारे ,मा.राजकुमार तिरभाने ता.संघटक अ. भा. अनिस शाखा कारंजा उपस्थित होते .सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते महापुरुषांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले.शिबिर मध्ये सहभागी होणे निशुल्क होते. अ. भा. अ. नि. स सदस्यता शुल्क 50 रुपये होते. शिबीर स्थळी सर्वांना सदस्यता अर्ज भरून नोंदणी करण्यात आली .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार तिरभाने यांनी केले ,सूत्रसंचालन संगीता पाटील तर आभार उमेश मेश्राम यांनी मानले .या वेळी पियुष रेवतकर ,उमेश पाचपोहर,विनोद दंडारे ,मनोज वानखेडे ,विजय कांबळे ,गंगाधर यावले उपस्थित होते .